महिलांसाठी सुवर्णसंधी – व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाखांचे बिनव्याजी कर्ज, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता येथे पहा

Sarkari Yojana For Women 2025 – केंद्र सरकारने महिलांसाठी लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana) सुरु केली आहे. या योजनेमधून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी 5 लाखांचे कर्ज देण्यात येते.

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना राबवल्या जातात. यामध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी देखील प्रोत्साहन दिले जाते. केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेमधून महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय 5 लाखांचे कर्ज केंद्र सरकारकडून दिले जाते.

लखपती दीदी (Lakhpati Didi Yojana) योजनेमधून पात्र लाभार्थ्यांना 5 लाखांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज फेडताना फक्त 5 लाख रुपये परत द्यावे लागतात. व्याजासाठी एकही रुपया देण्याची आवश्यक्ता नाही. फक्त महिलांसाठी ही योजना सुरु केली आहे.

लखपती दीदी (Ladki Bahin) योजनेमधून आतापर्यंत लाखो महिलांनी लाभ घेतला आहे. आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. या व्यवसायामधून त्यांनी इतरांना देखील रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

लखपती दीदी योजनेमध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्ज दिले जाते. लखपती दीदी योजना म्हणजे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आहे. योजनेमधून महिलांना स्किल ट्रेनिंग देऊन रोजगार निर्माण करण्यासाठी सक्षम केले जाते. यावेळी प्रोफेशनल ट्रेनर्सकडून ट्रेनिंग देण्यात येते.

Mukhyamantri Bal Aashirwad Yojana
Mukhyamantri Bal Aashirwad Yojana: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, दरमहा 4000 मिळणार – अशा कुठल्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही, आर्थिक नुकसानीस बळी पडू नका

लखपती दीदी योजनेचे फायदे

● लखपती दीदी योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना सर्वप्रथम आर्थिक मदत दिली जाते.

● तसेच त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले जाते.

● व्यवसाय सुरु करण्यापासून ते मार्केटिंग स्ट्रॅटेजीपर्यंत सर्व ट्रेनिंग दिले जाते.

● 5 लाख रूपयांच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही.

कर्ज कसं मिळवायचं? (How To Apply For Lakhpati Didi Scheme)

● 18 ते 50 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत

Ration card e-KYC update
Ration card e-KYC update: रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी नसेल तर नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत जाणार

● भारतामधील कोणत्याही राज्यातील महिला या योजनेत अर्ज करु शकतात.

● कर्ज मिळवण्यासाठी महिला बचत गटाची सदस्य असावी.

● योजनेत अर्ज सादर करतेवेळी काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

● आवश्यक कागदपत्रांमध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, मोबाईल नंबर देणे अनिवार्य आहे.

Leave a Comment