अखेर प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता या तारखेला Ladki Bahin Yojana April Installment Date

Ladki Bahin Yojana April Installment – महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून राज्यामधील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीमधील अपयशानंतर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली. ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली.

जानेवारीपासून योजनेमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून निकष देखील लावले गेले आहेत. या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतला आहे. अशा तक्रारी सरकारकडे आलेल्या होत्या. त्यामुळे आता योजनेमध्ये पडताळणी केली जात आहे.

Mukhyamantri Bal Aashirwad Yojana
Mukhyamantri Bal Aashirwad Yojana: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, दरमहा 4000 मिळणार – अशा कुठल्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही, आर्थिक नुकसानीस बळी पडू नका

याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर पोस्ट केली होती त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ही योजना 21 ते 65 वयोगटामधील महिलांसाठी लागू केली आहे, त्यामुळे 65 वर्षे पूर्ण होणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या कायम बदलत राहते. आतापर्यंत सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून अपात्र झाल्या आहेत.

तसेच, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचा देखील या योजनेंतर्गत विचार केला जात नाही. राज्यामधील जवळपास अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. महिलांच्या जीवनात त्यामुळे सकारात्मक बदल झाला आहे. या योजनेमध्ये अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज निकष आणि अटींमध्ये अपात्र ठरवण्यात आले आहेत. 

Ration card e-KYC update
Ration card e-KYC update: रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी नसेल तर नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत जाणार

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता 

लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2025) मुहुर्तावर मिळणार आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल. एप्रिल महिन्याच्या 10 व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील 9 व्या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढली होती.

Leave a Comment