RRB ALP Recruitment 2025 – भारतीय रेल्वेत 9900 असिस्टंट लोको पायलट पदांची मेगा भरती सुरू, पात्रता 10वी पास– लगेच अर्ज करा!

RRB ALP Recruitment 2025 – रेल्वेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती मंडळाने सहाय्यक लोको पायलटच्या 9900 पदांसाठी भरती (RRB ALP Vacancy) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत, सहाय्यक लोको पायलटच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रियेला 10 एप्रिल 2025 पासून सुरुवात झाली असून. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 9 मे 2025 आहे. रेल्वे असिस्टंट लोको पायलटच्या रिक्त पदांसाठी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया येथे जाणून घ्या.

RRB ALP Recruitment 2025 – शैक्षणिक पात्रता

RRB Assistant Loco Pilot पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा. तसेच, ITI किंवा संबंधित ट्रेडमध्ये अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असणारा उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. तसेच, येथे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेमध्ये विशेष सूट देण्यात येईल.

How To Apply RRB ALP Recruitment 2025: अर्ज असा करा

– सर्वप्रथम indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जा.

– होमपेजवर गेल्यानंतर ‘RRB Railway ALP Recruitment’ या लिंकवर क्लिक करा.

– येथे स्वतःची नोंदणी करा, लॉगिन क्रेडेन्शियल्स तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होतील.

Mukhyamantri Bal Aashirwad Yojana
Mukhyamantri Bal Aashirwad Yojana: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, दरमहा 4000 मिळणार – अशा कुठल्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही, आर्थिक नुकसानीस बळी पडू नका

– यानंतर संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरा.

– त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य KB साईजमध्ये अपलोड करा.

– त्यानंतर अर्ज शुल्क भरण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.

RRB ALP Selection Process: निवड प्रक्रिया

आरआरबी असिस्टंट लोको पायलट पदांसाठी उमेदवारांची निवड 3 टप्प्यांमध्ये केली जाईल. CBT 1 मध्ये पात्र असलेले उमेदवार CBT 2 साठी पात्र असतील. यानंतर संगणक आधारित अभियोग्यता चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल.

CBT 1 आणि 2 कसे असतील?

RRB ALP सीबीटी 1 परीक्षा 1 तासाची असणार आहे. यामध्ये 75 प्रश्न विचारले जातील. गणित, मानसिक क्षमता, सामान्य विज्ञान आणि सामान्य जागरूकता या विषयांवर प्रश्न विचारले जातील. तर CBT 2 ची परीक्षा ही 2 तास 30 मिनिटांची असणार आहे. येथे पेपर 2 भागांमध्ये विभागला जाईल. भाग – अ मध्ये 100 प्रश्न विचारले जातील, ते 1 तासात सोडवणे आवश्यक आहेत. आणि भाग – ब मध्ये 75 प्रश्न विचारले जातील ते 1 तासात सोडवणे आवश्यक आहेत.

Ration card e-KYC update
Ration card e-KYC update: रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी नसेल तर नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत जाणार

अर्ज शुल्क किती?

RRB Loco Pilot भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 500 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल आणि CBT 1 परीक्षेत बसल्यानंतर त्यांना 400 रुपये परत दिले जातील. तर , EBC, SC, ST, महिला आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकडून 250 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल आणि CBT 1 परीक्षेत बसल्यानंतर त्यांना संपूर्ण रक्कम परत दिली जाईल.

अधिक माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटला एकदा भेट द्या. येथे तुम्हाला अर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती पहायला मिळेल.

Leave a Comment