Majhi Ladki Bahin Yojana Update: माझी लाडकी बहीण योजना बंद का झाली? कारण जाणून घ्या आणि तक्रार अर्ज करा!

Majhi Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या महत्वाकांक्षी योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेत आतापर्यंत दरमहा हजारो महिलांना आर्थिक लाभ मिळत होता. मात्र अलीकडे शासनाने काही बदल व अटींची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे.

योजनेत काय बदल झालेत? (Majhi Ladki Bahin Yojana Update)

• फक्त दोन महिलांनाच लाभ

आता या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच मिळणार आहे. अनेक कुटुंबांमधून तिसरी वा चौथी बहिणही लाभासाठी अर्ज करत होती. काहींनी वेगळे रेशनकार्ड असल्याचे दाखवून पात्र असल्याचा दावा केला, तर काहींनी वय कमी असूनही चुकीची माहिती भरून लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला. आता अशा सर्व अर्जदार महिलांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे.

• ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ शेरा

दोनपेक्षा जास्त अर्जदार आढळल्यास त्यांच्या नावापुढे ‘FSC Multiple in Family’ असा शेरा टाकण्यात येतो आणि त्यांचा लाभ थेट बंद केला जातो.

• उत्पन्न पडताळणीची सुरुवात – ऑगस्टपासून

आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार ऑगस्ट 2025 पासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असल्यास अशा महिलांची पडताळणी केली जाईल आणि गरज नसलेल्या अर्जदारांचा लाभ थांबवण्यात येईल.

पात्रतेच्या मुख्य अटी (Majhi Ladki Bahin Yojana Updated Criteria)

• अर्जदार महिला 18 ते 65 वयोगटातील असावी
• वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे
• एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना योजनेचा लाभ मिळेल
• कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे
• लाभार्थीने इतर कोणत्याही वैयक्तिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा

Ladki Bahin Yojana KYC Last Date
Ladki Bahin Yojana KYC Last Date: लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटचा दिवस

ज्यांचा लाभ बंद झाला आहे त्यामागील कारणे

• वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांचे लाभ आपोआप बंद
• स्वतःकडे किंवा कुटुंबाकडे चारचाकी वाहन असलेल्या महिलांचा लाभ बंद
• इतर योजनांचा लाभार्थी असल्यास लाभ बंद (उदा. संजय गांधी निराधार योजना)
• 18 वर्षांखालील असूनही खोटे वय दाखवून अर्ज करणाऱ्यांचे लाभ रद्द
• एकाच कुटुंबातून तीसऱ्या व चौथ्या महिलांचे लाभ बंद

तक्रार नोंदविण्याची सोय (Majhi Ladki Bahin Yojana Complaint)

लाडकी बहिण योजनेचा लाभ अचानक बंद झालेल्या महिलांसाठी ‘Grievance’ (तक्रार) नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे:

ऑनलाईन तक्रार:

• योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘Grievance’ पर्यायाद्वारे
• लॉगिन आयडी तयार करून तक्रार नोंदवता येते

ऑफलाइन तक्रार:

• तालुकास्तरावरील बालविकास प्रकल्प कार्यालय
• किंवा महिला व बालविकास कार्यालयात जाऊन तक्रार अर्ज भरता येतो

या पर्यायांचा लाभ घेऊन महिलांनी आपली पात्रता पुन्हा तपासून घ्यावी.

e pik pahani last date
e pik pahani last date: ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

तक्रार नोंदवलेले लाभार्थी (Majhi Ladki Bahin Yojana Benefit Rejected Reasons)

• एकूण अर्जदार महिला: 2 कोटी 57 लाख
• तक्रार नोंदवलेले लाभार्थी: 10 लाखांपेक्षा अधिक
• अनेक महिलांचे लाभ “RTO Rejected”, “Adar Scheme Beneficiary”, “FSC Multiple in Family” अशा कारणांनी थांबवले गेले आहेत.

महत्वाचा संदेश (Majhi Ladki Bahin Yojana Benefits)

या योजनेचा खरा लाभ गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांपर्यंत पोहोचावा, या हेतूने ही कठोर पडताळणी केली जात आहे. गैरमार्गाने लाभ घेणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने ही कार्यवाही सुरू केली आहे. जर तुमचा लाभ चुकीने थांबवला गेला असेल, तर त्वरित तक्रार नोंदवा आणि आवश्यक दस्तावेज सादर करा.

➡️ एकाच घरातील दोन भावांना घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Comment