Majhi Ladki Bahin July 2025 Payment Status: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला जूनमध्ये एक वर्ष पूर्ण झाले आहे. ही योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात सुरू केली होती. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या योजनेअंतर्गत पहिल्यांदा लाभ देण्यात आला होता.
लाडकी बहीण योजना जुलै हप्ता (Majhi Ladki Bahin July 2025 Payment Details)
या योजनेचा पहिला टप्पा म्हणजे एक वर्ष पूर्ण झाले असून, त्या कालावधीत 12 महिन्यांचे नियमित लाभ बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले. परंतु, दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा लाभ म्हणजे या वर्षी जुलैचा हप्ता (Ladki Bahin July Hafta) अद्याप जमा झालेला नाही, यामुळे अनेक लाभार्थी बहिणींमध्ये चिंता आणि संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती.
जुलैचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार (Ladki Bahin June Hafta date)
महिला आणि बालकल्याण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 5 तारखेपर्यंत हा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे अनुदान म्हणजेच बहिणींचे मासिक ‘वेतन’ असल्यासारखे आहे, आणि सरकारने हे नियमितपणे देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
दोन कोटी 47 लाख लाडक्या बहिणी लाभार्थी
या योजनेचा लाभ गेल्या वर्षभरात राज्यातील तब्बल दोन कोटी ३४ लाख महिलांना मिळाला होता. मात्र, यानंतर लाभार्थ्यांची संख्या वेळोवेळी तपासून निकष न पूर्ण करणाऱ्या काही महिलांना अपात्र ठरवण्यात आले. यामुळे आता लाभार्थ्यांची अंतिम संख्या सुमारे 2.47 कोटी बहिणींपर्यंत स्थिरावली आहे.
महिला विकास विभागाला दिलेल्या आदेशानुसार, निकषात न बसणाऱ्या बहिणींना वगळून खऱ्या अर्थाने गरजू आणि गरीब महिलांची अंतिम यादी तयार केली जात आहे. यामुळे योजना अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे.
Majhi Ladki Bahin July 2025 Installment
‘लाडकी बहीण’ योजना ही केवळ आर्थिक मदत नसून राज्य सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणाचा एक सकारात्मक टप्पा आहे. या योजनेंतर्गत मिळणारा मासिक लाभ महिलांना आर्थिक आधार देतो, त्यांचा आत्मविश्वास वाढवतो, आणि त्यांना स्वाभिमानाने जगता येण्यासाठी मदत करतो.
तर बहिणींनो, जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल, आणि अजून तुमच्या खात्यात जुलै महिन्याचा लाभ जमा झालेला नसेल, तर काळजी करू नका – तो जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नक्की जमा होणार आहे.
➡️ पीएम किसान 2000 ची तारीख जाहिर – शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा केंद्र सरकारचा इशारा