PM Kisan 20th installment date 2025: पीएम किसान 2000 ची तारीख जाहिर – शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा केंद्र सरकारचा इशारा

PM Kisan 20th installment date 2025: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा 2000 रुपयांचा हप्ता, म्हणजेच एकूण 6000 रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते. सध्या या योजनेच्या 20 व्या हप्त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा सुरु आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट (PM Kisan fake message alert)

20 वा हप्ता जाहीर होण्याआधीच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पीएम किसानच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून एक स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की, शेतकऱ्यांनी कोणत्याही अनोळख्या लिंक, कॉल्स किंवा मेसेजेस पासून सावध राहावे.

➡️ येथे सूचना पहा

फसवणुकीपासून सावध राहा (PM Kisan official website link)

गेल्या काही काळात सोशल मीडियावर पीएम किसान योजनेच्या नावावरून खोटी माहिती, फसव्या लिंक्स आणि दिशाभूल करणारे मेसेजेस पसरवले जात आहेत. काही भामटे शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती गोळा करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात सरकारकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की:

Ladki Bahin Yojana KYC Last Date
Ladki Bahin Yojana KYC Last Date: लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटचा दिवस

• फक्त अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in आणि
• X प्लॅटफॉर्मवरील अधिकृत हँडल @pmkisanofficial

याच माध्यमातूनच माहिती घ्या.
कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलवर किंवा मेसेजवर क्लिक करू नका. लिंक किंवा OTP मागणाऱ्यांपासून लांब रहा.

20 व्या हप्त्याची अपेक्षित वेळ आणि माहिती (PM Kisan 20th installment)

पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. या हप्त्याचा लाभ 10 कोटी 4 लाख 67 हजार 693 शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यात महाराष्ट्रातील तब्बल 93 लाख 25 हजार 774 लाभार्थी सामील होते.
पुढील 20 वा हप्ता नेहमीप्रमाणे सुमारे 4 महिन्यांच्या अंतराने दिला जाईल. त्यामुळे, 20 वा हप्ता जुलै किंवा ऑगस्ट 2025 दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी अधिकृत घोषणा महत्त्वाची आहे.

महाराष्ट्रासाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’

केंद्र सरकारच्या पीएम किसान (PM-KISAN) योजनेप्रमाणेच, महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (NSMNY)’ सुरु केली आहे. या योजनेअंतर्गतही शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. अशाप्रकारे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून एकूण वार्षिक 12,000 रुपये मिळतात.

e pik pahani last date
e pik pahani last date: ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

शेतकरी बांधवांनो हे लक्षात ठेवा (PM Kisan 2000 rupees payment status)

• केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा
• अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या लिंक, कॉल्स, मेसेजेसकडे दुर्लक्ष करा
• आपल्या बँक तपशीलांची माहिती कोणालाही देऊ नका
• अद्ययावत माहितीसाठी @pmkisanofficial हँडल फॉलो करा

PM Kisan 20th installment date 2025

पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्याचा एक मोठा आधार आहे. मात्र या योजनेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहणे हे प्रत्येक शेतकऱ्याचं कर्तव्य आहे. सरकारकडून वेळोवेळी सतर्कतेचे इशारे दिले जात आहेत, ते गांभीर्याने घ्या. योग्य माहिती मिळवण्यासाठी नेहमी अधिकृत वेबसाइट आणि खात्यांवरच विश्वास ठेवा.

➡️ मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, दरमहा 4000 मिळणार – अशा कुठल्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही, आर्थिक नुकसानीस बळी पडू नका

Leave a Comment