Maharashtra solar agriculture pump yojana: सौर कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी महावितरणचा महत्त्वपूर्ण निर्णय – जाणून घ्या सविस्तर

Maharashtra solar agriculture pump yojana: महाराष्ट्र राज्याने सौर कृषिपंप बसविण्यात देशात आघाडी घेतली असून, आतापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून तब्बल 5 लाख 65 हजार सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. येत्या काळात आणखी 5 लाख सौर कृषिपंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबरोबरच, या पंपांच्या देखभाल आणि तक्रार निवारणासाठी महावितरणने खास उपाययोजना केल्या आहेत.

वादळामुळे नुकसान – महावितरणकडून तत्काळ उपाययोजना

मे महिन्यात आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे व मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सौर पॅनेल्सचे नुकसान झाले. काही भागांमध्ये पंप बंद पडणे, पाण्याचा दाब कमी होणे अशा समस्या उभ्या राहिल्या. या अडचणींवर त्वरित आणि परिणामकारक उपाय करण्यासाठी महावितरणने नवीन सेवा सुविधा सुरू केल्या आहेत.

तक्रार नोंदवण्यासाठी ऑनलाईन व फोन सेवा उपलब्ध

शेतकऱ्यांना तक्रार नोंदवताना घरातूनच सुविधा मिळावी यासाठी टोल फ्री क्रमांक आणि ऑनलाइन तक्रार नोंदणीची सोय करण्यात आली आहे. सौर पंपासंबंधित पुढील तक्रारींसाठी त्वरित कारवाई होणार आहे:

• पॅनेल तुटणे किंवा चोरी होणे
• पंप चालू न होणे
• ऊर्जा संच बिघडणे
• पाण्याचा दाब कमी येणे

तक्रार नोंदवताना फक्त लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे. याशिवाय, जिल्हा, तालुका, गाव व नावाची माहिती दिल्यासही तक्रार स्वीकारली जाईल.

Maharashtra Rain Forecast
Maharashtra Rain Forecast: पाऊस लांबला; या तारखेनंतर पुन्हा मुसळधार

➡️ तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? घरबसल्या मोबाईलवरून पहा

पाच वर्षांची देखभाल – शेतकऱ्यांना कोणताही खर्च नाही

महावितरणने स्पष्ट केले आहे की, सौर कृषिपंप बसवल्यानंतर पुढील पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादार कंपनीचीच राहील. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे खर्च करावा लागणार नाही.

• तक्रार नोंदविल्यानंतर 3 दिवसांच्या आत दुरुस्ती पूर्ण करणे बंधनकारक
• प्रत्येक पुरवठादार कंपनीने सेवा केंद्र स्थापन करणे अनिवार्य
• दुरुस्ती पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना SMS द्वारा माहिती देण्यात येईल

महावितरणकडून देखरेख व जबाबदारीचे आदेश

शेतकऱ्यांच्या तक्रारी वेळेवर सोडविल्या जात आहेत की नाही, याची देखरेख प्रत्येक मंडलाचे अधीक्षक अभियंते करतील. यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी कडक आदेश दिले आहेत.

तक्रार कशी नोंदवायची?

टोल फ्री क्रमांक:

1800-233-3435
1800-212-3435

Get education loan in 15 days
Get education loan in 15 days: फक्त 15 दिवसांत मिळणार एज्युकेशन लोन – आता बँकेत जाण्याची झंझट मिटली

ऑनलाइन तक्रार नोंदणीसाठी:

महावितरणच्या संकेतस्थळावर 44 पुरवठादार कंपन्यांच्या लिंक एकत्रित दिल्या आहेत. तिथून तक्रार नोंदवता येईल.

➡️ संकेतस्थळ: https://www.mahadiscom.in

शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन

महावितरणने सर्व सौर कृषिपंपधारक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, कोणतीही अडचण आल्यास वरील सुविधा तत्काळ वापरून तक्रार नोंदवा आणि आपला हक्क सुरक्षित ठेवा.

➡️ शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान थेट खात्यात; अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती जाणून घ्या!

Leave a Comment