Meri Panchayat App information: डिजिटल युगात आता गावाचं प्रशासनही मोबाईलच्या एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध झालं आहे. केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘मेरी पंचायत’ अॅप (Meri Panchayat App) च्या माध्यमातून गावातील प्रत्येक नागरिकाला आपल्या गावातील प्रत्येक खर्चाची, कामांची, आणि निर्णयांची थेट माहिती मिळणार आहे. हे अॅप म्हणजे प्रशासनात पारदर्शकतेचा नवा आणि महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.
गावाच्या विकासात पारदर्शकता – आता गावकरीही होतील माहितीपूर्ण!
आतापर्यंत अनेकदा ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीचा नेमका उपयोग कसा केला जातो, कोणती कामं सुरू आहेत, याची स्पष्ट माहिती गावकऱ्यांना मिळत नसे. पण आता हे चित्र बदलत आहे. ‘मेरी पंचायत’ अॅपच्या मदतीने गावातील प्रत्येक कामाची माहिती, खर्चाचा तपशील, निधी कुठून आला आणि कुठे वापरला गेला – हे सगळं थेट आणि पारदर्शकपणे तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. (Digital Gram Panchayat app)
➡️ लाडक्या बहिणींना ‘जून’ चे 1500 की 2100 मिळणार? लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी
या अॅपमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळेल?
• आपल्या ग्रामपंचायत सदस्यांची संपूर्ण यादी
• स्थापन झालेल्या समित्यांची माहिती आणि त्यांच्या अध्यक्षांची नावं
• ग्रामपंचायतीने दिलेल्या नवीन सूचना, नोटीसेस
• गावाला मिळालेलं सरकारी अनुदान आणि त्याचा नेमका वापर
• कोणत्या योजनेतून कोणती कामं सुरू आहेत
• बँक खात्यांची संख्या, खर्चाचा तपशील, शिल्लक रक्कम
• गावातील पाण्याचे स्रोत, नळजोडण्या, किती आणि कुठे आहेत
• आणि महत्त्वाचं म्हणजे – प्रत्येक कामासाठी किती खर्च झाला याचा स्पष्ट हिशोब!
गावकऱ्यांचा फीडबॅक – आता फोटोसह थेट प्रशासनाला!
काम चांगलं झालंय? की अजून सुधारणा हवी? आता गावकरी थेट फोटोसह अभिप्राय (Feedback) देऊ शकतात. एखाद्या रस्त्याचं काम निकृष्ट असेल, तर फोटो टाका आणि कळवा. चांगलं काम झालं असेल, तर तसंच कौतुकही करा! यामुळे प्रशासनालाही सुधारण्याची दिशा मिळेल आणि कामात जबाबदारी वाढेल.
कोणत्या कामासाठी किती खर्च?
हे अॅप एक प्रकारे ग्रामपंचायतीचा खुला हिशोब आहे. आता तुम्ही सहज पाहू शकता (Panchayat budget details online) कोणत्या कामासाठी किती रक्कम मंजूर झाली, त्यातून किती खर्च झाला आणि किती शिल्लक आहे. पारदर्शकता, जनजागृती आणि जबाबदारी (Rural governance transparency app) – या सगळ्यांचा संगम आता एकाच अॅपमध्ये अनुभवायला मिळतो!
तुमचा हक्क, तुमच्या हातात – माहितीची चावी आता तुमच्याजवळ!
‘मेरी पंचायत’ अॅपमुळे ग्रामपंचायतीचं संपूर्ण कामकाज, निधीचं वाटप, खर्च आणि शिल्लक रक्कम याचा पारदर्शक हिशोब (Track Gram Panchayat fund usage Online) आता गावकऱ्यांच्या हातात आला आहे. माहितीचा अधिकार आता प्रत्यक्षात अनुभवता येतोय. गावकऱ्यांचा सहभाग, प्रशासनाची जबाबदारी आणि कामातील पारदर्शकता या सगळ्यांचा संगम या अॅपमुळे साध्य झाला आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर मिळणारी ही माहिती गावाच्या सशक्त आणि जबाबदारीपूर्ण विकासाची खरी सुरुवात ठरते.