Drip Irrigation Subsidy Maharashtra: शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान थेट खात्यात; अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती जाणून घ्या!

Drip Irrigation Subsidy Maharashtra: शेती करण्यासाठी सर्वात मूलभूत आणि अपरिहार्य घटक म्हणजे पाणी. जर पाणीच नसेल, तर पीक घेणे अशक्य ठरते. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई ही शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरते. याशिवाय काही भागांत पावसाचे प्रमाण जरी चांगले असले, तरी जमिनीत पाण्याचे प्रमाण अपुरेच असते.

अशा स्थितीत सूक्ष्म सिंचन प्रणाली (Micro Irrigation System) म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरते. अगदी विहिरीत, बोअरवेलमध्ये किंवा तलावात पाण्याचा साठा कमी असतानाही, सूक्ष्म सिंचनामुळे थोडक्याच पाण्यात पीक फुलवता येते. आता सरकारने या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांना मोठे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

Drip Irrigation Subsidy Maharashtra

सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिबक सिंचन (Drip Irrigation) आणि तुषार सिंचन (Sprinkler Irrigation) यांचा समावेश असलेली एक कार्यक्षम सिंचन पद्धत आहे. या पद्धतीमुळे पाण्याचा अपव्यय टाळून थेट झाडांच्या मुळांजवळ आवश्यक तेवढेच पाणी दिले जाते. यामुळे पाण्याची बचत तर होतेच, शिवाय उत्पादनातही वाढ होते.

‘प्रति थेंब अधिक पिक’ योजना – शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास (RKVY drip irrigation) योजनेअंतर्गत ‘प्रति थेंब अधिक पिक’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान देण्यात येते. याचा उद्देश म्हणजे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणे आणि शेतीला शाश्वत बनवणे.

सूक्ष्म सिंचनासाठी किती अनुदान मिळते? (Micro irrigation subsidy 2025)

शेतकऱ्यांना २५% ते ९०% पर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत मिळू शकते. यामध्ये विविध घटकांनुसार अनुदानाचे प्रमाण ठरवले जाते:

Mukhyamantri Bal Aashirwad Yojana
Mukhyamantri Bal Aashirwad Yojana: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, दरमहा 4000 मिळणार – अशा कुठल्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही, आर्थिक नुकसानीस बळी पडू नका

• भूधारक शेतकरी (Small farmers): ५५% पर्यंत अनुदान
• बहुभूधारक शेतकरी (Large landholders): ४५% पर्यंत अनुदान
• मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना: पूरक २५% ते ३०% पर्यंत अतिरिक्त अनुदान
• अनुसूचित जातीसाठी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
• अनुसूचित जमातीसाठी: बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

नोंद: हे अनुदान ५ हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठी लागू आहे.

शेतकऱ्यांना अनुदान कुठे आणि कसे मिळेल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी (Mahadbt) पोर्टल’ वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज स्वीकृत झाल्यानंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जाते.

अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे

• सातबारा उतारा (7/12) व ८ अ उतारा
• आधार कार्ड
• बँक पासबुक
• फार्मर आयडी
• सिंचन यंत्रणांची सातबाऱ्यावर नोंद आवश्यक
• नोंद नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करणे गरजेचे आहे.

➡️ How to apply for PM Mudra Loan online: पंतप्रधान मुद्रा योजनेतुन कसे घ्याल 10 लाखांपर्यंतचे कर्ज?

Ration card e-KYC update
Ration card e-KYC update: रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी नसेल तर नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत जाणार

या योजनेचे फायदे

• पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत
• पीक उत्पादनात वाढ
• खतांची कार्यक्षमता अधिक
• शेतीचा खर्च कमी आणि उत्पन्न वाढीचा हमी
• थेट खात्यात आर्थिक मदत – कोणतेही दलाल नाहीत

Government subsidy for drip irrigation

शेतकरी बांधवांनो, पाण्याच्या समस्येवर शाश्वत उपाय म्हणून सूक्ष्म सिंचन हाच एक विश्वासार्ह मार्ग आहे. राज्य शासनाच्या प्रति थेंब अधिक पिक या योजनेचा लाभ घेऊन आपण आपल्या शेतीला समृद्ध बनवू शकता. आजच महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपला अर्ज भरा आणि अनुदानाचा लाभ घ्या.

अधिक माहितीसाठी भेट द्या: https://mahadbt.maharashtra.gov.in

Leave a Comment