CIBIL score check impact: आजच्या डिजिटल युगात आर्थिक निर्णय घेताना CIBIL स्कोअर (क्रेडिट स्कोअर) फार महत्त्वाचा ठरतो. कर्ज घ्यायचं असेल, क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या फायनान्स सुविधा घ्यायच्या असतील, तर सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासला जातो. हा स्कोअर जितका चांगला तितकी कर्जमंजुरीची शक्यता अधिक, आणि त्याचबरोबर व्याजदरही कमी असतो
पूर्वी सिबिल स्कोअर तपासायला वेळ लागायचा आणि प्रक्रिया गुंतागुंतीची होती. पण आता मोबाईल अॅप्समुळे हे खूपच सोपं झालंय, एका क्लिकवर काही सेकंदांत स्कोअर समोर येतो. त्यामुळेच अनेक लोक आपला सिबिल स्कोअर वेळोवेळी तपासतात. मात्र, सतत स्कोअर तपासत राहणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं, हे फारच थोड्या लोकांना माहित असतं
CIBIL score check impact
CIBIL (Credit Information Bureau India Limited) स्कोअर हा तुमच्या क्रेडिट व्यवहारांचा आरसा असतो. हा स्कोअर 300 ते 900 या दरम्यान असतो. 700 पेक्षा जास्त स्कोअर हा चांगला मानला जातो. तो बँकांना आणि वित्तसंस्थांना हे समजण्यास मदत करतो की तुम्ही एक विश्वासार्ह कर्जदार आहात की नाही
CIBIL स्कोअर का कमी होतो?
तुमचा सिबिल स्कोअर अनेक घटकांवर आधारित असतो, उदा.
• कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे वेळेवर न भरलेले हप्ते
• ओव्हरड्यू रक्कम
• कर्जाची एकूण रक्कम
• नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी वारंवार अर्ज
• आणि हो… वारंवार सिबिल स्कोअर तपासणंही!
वारंवार स्कोअर तपासल्यामुळे तुमच्या स्कोअरवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, पण हे कसं घडतं?
‘हार्ड’ आणि ‘सॉफ्ट’ चेक – फरक समजून घ्या
सिबिल स्कोअर तपासण्याचे दोन प्रकार असतात:
• हार्ड इनक्वायरी (Hard Inquiry)
जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता आणि बँक किंवा फायनान्स कंपनी तुमचा सिबिल स्कोअर तपासते, तेव्हा हे हार्ड चेक (Hard credit check) असते. एकाच वेळी वेगवेगळ्या बँकांकडून स्कोअर तपासला गेला, तर तुमचं क्रेडिट प्रोफाईल रिस्की वाटू लागतं. त्यामुळे स्कोअर घसरतो
• सॉफ्ट इनक्वायरी (Soft Inquiry)
जेव्हा तुम्ही स्वत: तुमचा क्रेडिट स्कोअर चेक करता, तेव्हा हे सॉफ्ट चेक (soft credit check) मानले जाते. याचा स्कोअरवर फारसा परिणाम होत नाही. पण जर वारंवार आणि विविध अॅप्सद्वारे तो तपासला, तर काही अंशी त्याचाही नकारात्मक परिणाम होऊ शकतो
वेगवेगळ्या अॅप्सवर स्कोअर तपासणं धोकादायक का?
सध्या प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर अनेक अॅप्स उपलब्ध आहेत, जे मोफत स्कोअर दाखवतात. पण हे करताना खालील दोन धोके संभवतात:
• डेटा प्रायव्हसीचा धोका
प्रत्येक अॅप तुमच्याकडून वैयक्तिक माहिती घेते (नाव, मोबाईल नंबर, पॅन नंबर, आर्थिक माहिती इ.) ही माहिती सुरक्षित हाताळली जाईल याची खात्री नसते. त्यामुळे फसवणुकीचा धोका वाढतो.
• स्कोअरवर होणारा परिणाम
वेगवेगळ्या अॅप्सवर वारंवार स्कोअर तपासल्यामुळे, काहीवेळा डेटा एजन्सींच्या रिपोर्टमध्ये सतत सॉफ्ट इनक्वायरी नोंदवली जाते. यामुळे बँकांना वाटू शकतं की व्यक्ती आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहे
तर मग स्कोअर तपासायचाच नाही का?
तसं नाही! तुम्ही नक्कीच तुमचा सिबिल स्कोअर तपासावा, पण त्यासाठी काही साधे नियम लक्षात घ्या:
• दर महिन्याला एकदाच स्कोअर तपासा
• फक्त अधिकृत प्लॅटफॉर्मचा वापर करा – जसं की CIBIL चं अधिकृत संकेतस्थळ (https://www.cibil.com), किंवा बँकांचे अधिकृत अॅप्स (SBI, HDFC, ICICI इत्यादी)
• अनधिकृत किंवा जास्त Permissions मागणाऱ्या अॅप्सपासून दूर राहा
• स्कोअरवर लक्ष ठेवणं महत्वाचं असलं तरी त्याचा अतिरेक टाळा
CIBIL score check impact
CIBIL स्कोअर म्हणजे फक्त एक संख्या नाही – ती तुमच्या आर्थिक शिस्तीचा आरसा आहे. तुम्ही वेळेवर कर्ज फेडत आहात का, आर्थिक जबाबदारीने वागता का, हे त्यावरून ठरते. त्यामुळे स्कोअर वाढवण्यासाठी सतत त्याच्याकडे पाहत राहण्यापेक्षा, चांगले आर्थिक निर्णय घेणं जास्त फायदेशीर ठरेल