Ayushman Bharat Scheme Benefits: आयुष्मान कार्डमुळे कसा मिळतो 5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ? पहा संपूर्ण माहिती

Ayushman Bharat Scheme Benefits: आजकाल वैद्यकीय उपचारांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत गरीब व गरजू कुटुंबांसाठी उपचार खर्च भागवणं खूप अवघड होत आहे. हीच गरज ओळखून भारत सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली – ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY)’ या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस आरोग्य सेवा कवच दिले जाते. पण अनेकांना अजूनही माहिती नाही की, हा लाभ मिळवण्यासाठी आयुष्मान कार्ड कसं वापरायचं आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा कसा घ्यायचा. चला तर मग, याची सविस्तर माहिती घेऊया

Ayushman Bharat Scheme Benefits

आयुष्मान भारत योजना ही केंद्र सरकारची एक सार्वत्रिक आरोग्य संरक्षण योजना आहे, जी गरीब, दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोफत उपचार सुविधा पुरवते. यामध्ये:

• प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय कवच दरवर्षी दिले जाते.
• सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयांमध्येही उपचार घेता येतात.
• 1500 हून अधिक आजारांवर उपचार उपलब्ध आहेत – ज्यामध्ये शस्त्रक्रिया, ॲडमिट होणे, औषधे, तपासण्या यांचा समावेश असतो.

Ayushman Bharat Health Card

आयुष्मान कार्ड हे तुमचं डिजिटल आरोग्य ओळखपत्र असतं, ज्याद्वारे तुम्ही PM-JAY योजनेचा लाभ घेऊ शकता. हे कार्ड रुग्णालयात दाखवून तुम्ही कॅशलेस उपचार घेऊ शकता. यात तुमचे नाव, योजनेअंतर्गत याचिकेचा क्रमांक आणि QR कोड असतो.

कोण पात्र आहे या योजनेसाठी? (Ayushman Card Eligibility)

आयुष्मान योजनेसाठी पात्रता ही मुख्यतः SECC 2011 (Social, Economic and Caste Census) नुसार ठरते. पात्रता खालील प्रमाणे आहे:

• ग्रामीण भागातील भूमिहीन मजूर, झोपडपट्टीत राहणारे, बेरोजगार, अपंग व्यक्ती.
• शहरी भागातील रिक्षा चालक, फेरीवाले, घरकाम करणारे, बांधकाम कामगार इत्यादी.
• बीपीएल (Below Poverty Line) कार्डधारक.
• आरोग्य विभागाने ओळखलेली पात्र कुटुंबे.

Aadhar Seeding for DBT Payments
Aadhar Seeding for DBT Payments: हप्ता जमा झाला नाही? बँक खात्याला आधार लिंक करणे आणि सीडिंग करणे यात मोठा फरक! सरकारी अनुदानासाठी ‘हे’ काम करणे आहे अनिवार्य

पात्रता तपासण्यासाठी mera.pmjay.gov.in या वेबसाइटला भेट देऊन आपला मोबाइल नंबर व OTP टाकून तपासता येते.

आयुष्मान कार्ड कसे मिळवायचे? (Ayushman Card Apply Online)

➤ ऑनलाईन नोंदणी

https://bis.pmjay.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
• आपला आधार क्रमांक व मोबाइल नंबर टाका.
• पात्रता असल्यास कार्डसाठी अर्ज भरा.

➤ सीएससी केंद्रामार्फत (CSC – Common Service Center)

• जवळच्या CSC केंद्रावर जाऊन आपल्या कागदपत्रांसह (आधार, राशन कार्ड) अर्ज करू शकता.
• तेथून आपले आयुष्मान कार्ड तयार केले जाईल.

➤ आरोग्य मित्र / हेल्थ कॅम्प

• काही रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र नियुक्त केले जातात जे तुमच्या मदतीने नोंदणी व कार्ड काढून देतात.

आयुष्मान कार्डद्वारे मिळणारे लाभ (Ayushman Bharat Scheme Benefits)

• 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार दरवर्षी.
• देशभरातील 25,000+ हून अधिक नोंदणीकृत रुग्णालये (खासगी आणि सरकारी).
• कॅशलेस उपचार – रुग्णालयात पैसे भरण्याची गरज नाही.
• औषधं, तपासण्या, ICU सुविधा, शस्त्रक्रिया यांचा समावेश.
• कार्ड एकदा मिळाल्यावर देशभरात कुठेही वापरता येते.

आयुष्मान कार्डद्वारे उपचार घेण्याची प्रक्रिया

• रुग्णालयात आयुष्मान कार्ड दाखवा.
• रुग्णालयात ‘आरोग्य मित्र’ कडून तुमचं पात्रता पडताळणी होईल.
• आवश्यक असल्यास तुमच्या उपचाराचा प्रस्ताव शासनाकडे जाईल.
• मंजुरी मिळाल्यावर मोफत उपचार सुरु होतील.
• तुम्हाला कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत.

Ladki Bahin Yojana Helpline Number
आदिती तटकरेंची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा; आता ‘या’ नंबरवर कॉल करताच सुटणार सर्व प्रश्न Ladki Bahin Yojana Helpline Number

महत्त्वाच्या टीप्स (Ayushman Bharat Yojana)

• कार्ड काढताना योग्य मोबाईल नंबर व आधार कार्ड वापरा.
• कार्ड हरवल्यास पुन्हा CSC केंद्रावरून मिळवता येते.
• तुमच्या कुटुंबात सर्व सदस्यांसाठी स्वतंत्र कार्ड तयार करून घेता येते.

Ayushman Bharat Scheme Benefits

आयुष्मान भारत योजना ही गरिबांसाठी देवदूतासारखी आहे. 5 लाख रुपयांचा आरोग्य सुरक्षा कवच कोणत्याही आर्थिक अडचणीच्या काळात तुमच्या मदतीला धावून येतो. आजच तुमचं आयुष्मान कार्ड बनवा आणि या योजनेचा पुरेपूर लाभ घ्या.

➡️ तुमच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे का? मग ‘अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र’ नक्की काढा – जाणून घ्या फायदे!

Leave a Comment