रेल्वेत पहिली ATM सेवा सुरु, धावत्या ट्रेनमधून आता काढता येणार पैसे, राज्यात ‘या’ रेल्वेत सुरू झाली सुविधा

Train ATM News – भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत अत्याधुनिक सेवा सुरू केली आहे. आता प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्ये ATM मधून पैसे काढता येणार आहेत. ही सुविधा सध्या पंचवटी एक्स्प्रेस मध्ये चाचणी स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. ही देशातील पहिलीच ट्रेन ठरली आहे ज्यामध्ये ऑन-बोर्ड ATM उपलब्ध आहे.

कुठल्या ट्रेनमध्ये बसवण्यात आला ATM?

पंचवटी एक्स्प्रेस ही गाडी मनमाड ते मुंबई दरम्यान धावते. या गाडीच्या एसी डब्यात ATM बसवण्यात आलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ने या चाचणीसाठी ATM उपलब्ध करून दिला आहे. डब्याच्या मागील बाजूच्या तात्पुरत्या पॅन्ट्री स्पेसमध्ये एक सुरक्षित क्युबिकल तयार करण्यात आलं असून, तेथे ATM मशीन लावण्यात आलं आहे.

ATM चाचणी यशस्वी – पण काही अडचणीही

चाचणी दरम्यान ATM यशस्वीरित्या कार्यरत राहिलं, मात्र कसारा-इगतपुरी दरम्यानच्या नो-नेटवर्क विभागात सिग्नल प्रॉब्लेम जाणवला. कारण त्या भागात बोगदे आणि सिग्नल गमावण्याची शक्यता अधिक असते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मशीनच्या कार्यक्षमतेवर अजूनही लक्ष ठेवलं जात आहे, आणि आवश्यक सुधारणा केल्या जातील.

Ladki Bahin Yojana KYC Last Date
Ladki Bahin Yojana KYC Last Date: लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटचा दिवस

तांत्रिक आणि संरचनात्मक बदल

मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये ATM बसवण्यासाठी:

• मशीनमध्ये खास तांत्रिक बदल
• कोचमध्ये स्ट्रक्चरल व इलेक्ट्रिक बदल
• शटर दरवाजाद्वारे सुरक्षा
• CCTV निगराणी

या सर्व गोष्टी केल्या गेल्या आहेत जेणेकरून धावत्या ट्रेनमध्ये ATM सुरळीत चालेल आणि सुरक्षितही असेल.

e pik pahani last date
e pik pahani last date: ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

भविष्यात काय?

जर ही सेवा लोकप्रिय झाली, तर इतर ट्रेनमध्येही ऑन-बोर्ड ATM बसवण्याचा विचार भारतीय रेल्वे करत आहे. ही सुविधा विशेषतः दुर्गम भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे. भारतीय रेल्वेचा हा नवा उपक्रम म्हणजे तंत्रज्ञान आणि प्रवाशांच्या गरजांचा उत्तम संगम आहे. आता ट्रेनमध्ये प्रवास करताना अचानक पैशांची गरज भासली, तरी ATM तुमच्या सेवेत असणार आहे!

Leave a Comment