Post Office Vs SBI FD Scheme – अलीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अनेकजण बँकांच्या FD योजनेत गुंतवणूक करतात. याशिवाय काहीजण पोस्ट ऑफिसच्या FD योजनेत गुंतवणूक करतात. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिस आणि SBI च्या FD योजनेची तुलना करणार आहोत.
जर तुम्हीही फिक्स डिपॉझिट (FD) मध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच खास ठरणार आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या FD योजनेची आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या FD योजनेची तुलना करणार आहोत. बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील FD योजना ऑफर करते. पोस्ट ऑफिस 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी FD योजना ऑफर करते.
Post Office Vs SBI FD Scheme
आज आपण पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या आणि SBI च्या 5 वर्षांच्या FD योजनेची तुलना करणार आहोत. सर्वात जास्त परतावा कोणत्या ठिकाणी मिळू शकतो याबाबत संपूर्ण कॅल्क्युलेशन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणती FD योजना ठरेल फायदेशीर
खरंतर, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून FD योजना ऑफर केली जात नाही, त्याऐवजी टाईम डिपॉझिट योजना ऑफर केली जाते ज्यालाच पोस्टाची FD योजना म्हणून ओळखली जाते
पोस्ट ऑफिसच्या 1 वर्षाच्या FD योजनेमध्ये गुंतवणूकदारांना 6.9% दराने, 2 वर्षाच्या FD योजनेमध्ये 7% दराने, 3 वर्षांच्या FD योजनेमध्ये 7.10% दराने आणि 5 वर्षांच्या FD योजनेमध्ये 7.50% दराने रिटर्न दिले जात आहेत.
म्हणजेच जर पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या FD योजनेमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर 7 लाख 24 हजार 974 रुपये मिळतील. यामध्ये 2 लाख 24 हजार 974 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत. सामान्य ग्राहक किंवा सीनियर सिटीजन दोघांनाही पोस्टाच्या या योजनेमधून सारखाच लाभ दिला जातो.
दुसरीकडे SBI च्या 5 वर्षांच्या FD योजनेत सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना वेगवेगळा व्याजदर दिला जातो. SBI कडून 5 वर्षांच्या FD योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना सध्या 6.50% दराने रिटर्न दिले जातात.
म्हणजेच जर एखाद्या सामान्य ग्राहकाने या FD योजनेमध्ये 5 लाखांची गुंतवणूक केली तर त्याला 6 लाख 90 हजार 210 रुपये मिळतील म्हणजेच 1 लाख 90 हजार 210 रुपये त्याला रिटर्न मिळणार आहेत. पण जर सीनियर सिटीजन ग्राहकाने SBI च्या 5 वर्षांच्या FD योजनेमध्ये गुंतवणूक केली तर त्यांना 7.50% दराने परतावा दिला जाईल.
म्हणजेच सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी पोस्टाची 5 वर्षांची FD योजना आणि SBI ची 5 वर्षांची FD योजना दोन्हीही सारख्याच आहेत. परंतु सामान्य ग्राहकांना पोस्टाची 5 वर्षांची FD योजना अधिक फायद्याची ठरणार आहे.