पीएम स्वनिधी योजना: फक्त आधार कार्ड वरून 50 हजार रुपयांचे कर्ज | PM Svanidhi Loan Scheme

PM Svanidhi Loan Scheme: छोटा व्यवसाय चालवणाऱ्यांना भांडवलाची कायमची चणचण असते. बँकांच्या दारात जाऊन कर्ज मागितले की व्याजाचे ओझे आणि कागदपत्रांचा डोंगर डोके दुखवतो. पण आता केंद्र सरकारची PM Svanidhi Yojana तुमच्यासाठी वरदान ठरली आहे. आधार कार्डच्या आधारावर 50 हजार रुपयांपर्यंत Aadhar card personal loan मिळते, तेही कोणतेही व्याज न देता. रस्त्यावरचा चहावाला असो की भाजीविक्रेता, ही योजना प्रत्येक छोट्या उद्योजकाला साथ देते.

ही योजना नेमकी काय आहे?

PM Svanidhi Loan Scheme ही मायक्रो क्रेडिट सुविधा आहे. कोरोना काळात रस्त्यावरील व्यावसायिकांना उभे करण्यासाठी ही सुरू झाली. पहिल्या टप्प्यात 10 हजार रुपये कर्ज मिळते, ते एका वर्षात फेडले तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार, आणि नंतर 50 हजार रुपये मिळतात. एकूण 80 हजारांपर्यंतची मदत तीन हप्त्यांत मिळू शकते. डिजिटल पेमेंट केल्यास कॅशबॅक आणि सबसिडीचा अतिरिक्त फायदा मिळतो. या योजनेमुळे लाखो लोकांनी आपले व्यवसाय पुन्हा सुरू केले. तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे.

व्याजदर: जरी या कर्जावर सुरुवातीला 7% व्याजदर असला तरी, नियमित परतफेड केल्यास हे व्याज अनुदान म्हणून परत मिळते, त्यामुळे ते व्यावहारिकदृष्ट्या बिनव्याजी होते.

योजनेची खास वैशिष्ट्ये

• व्याजमुक्त कर्ज: पहिल्या हप्त्यावर व्याज शून्य.
• गॅरंटी फ्री: कोणताही जामीनदार किंवा तारण नाही.
• लवचिक परतफेड: एक वर्षात EMI किंवा एकरकमी परतफेड.
• वाढती रक्कम: प्रत्येक फेडीनंतर दुप्पट लोन.
• कॅशबॅक बोनस: UPI, QR कोड पेमेंटवर प्रोत्साहन.

Ladki Bahin Yojana KYC Last Date
Ladki Bahin Yojana KYC Last Date: लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटचा दिवस

कोण घेऊ शकते लाभ ?

• भारतातील रहिवासी
• रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, हातगाडी चालक
• छोटे कारागीर किंवा स्टेशनरी दुकानदार
• कोरोना काळात नुकसान झालेल्यांना प्राधान्य
• एका कुटुंबातून फक्त एकच व्यक्ती
• आधार कार्ड असले की अर्ज करता येतो.

लागणारी कागदपत्रे (Required Documents)

• आधार कार्ड
• मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड
• बँक पासबुक झेरॉक्स
• दोन पासपोर्ट साइज फोटो
• व्यवसायाचा फोटो (वैकल्पिक)

ही कागदपत्रे घेऊन जवळच्या बँकेत किंवा स्वनिधी केंद्रात जा.

अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप (PM Svanidhi Loan Scheme Apply)

PM Svanidhi Yojana apply online करायचे असेल तर

e pik pahani last date
e pik pahani last date: ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

• प्रथम योजनेची अधिकृत वेबसाइट pmsvanidhi.mohua.gov.in वर जा
• Apply for Loan (10k/20k/50k) निवडा
• मोबाइल नंबर टाका, OTP मिळेल
• OTP टाकून फॉर्म उघडा
• फॉर्म भरून प्रिंट काढा, कागदपत्रे अपलोड करा,
• स्वनिधी केंद्रात जमा करा
• पडताळणीनंतर पैसे खात्यात जमा होतात.

मित्रांनो, ही योजना घेऊन अनेकांनी आपले छोटे बिझनेस मोठे केले आहेत. तुम्हीही उशीर करू नका, आजच अर्ज करा आणि स्वावलंबी व्हा!

➡️ लाडकी बहीण योजनेत e KYC करताना एरर येतोय? मग या वेळेत करा काम

Leave a Comment