लाडकी बहीण योजना: E-KYC करण्याची नवीन प्रक्रिया, अवघ्या 2 मिनिटांत करा Ladki Bahin Yojana E-KYC

Ladki Bahin Yojana E-KYC: योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया तुम्ही खालील सोप्या टप्प्यांमध्ये पूर्ण करू शकता.

eKYC प्रक्रिया (टप्प्याटप्प्याने):

पायरी 1: लाभार्थी महिलेची पडताळणी

• वेबसाईट उघडा: Google मध्ये ladkibahin.maharashtra.gov.in असे सर्च करा.
• ​अधिकृत पोर्टल उघडल्यानंतर, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा’ यावर टच करा.
• ​आधार क्रमांक (Aadhaar Number) आणि समोर दिलेला कॅप्चा (Captcha) व्यवस्थित भरा.
• ​‘मी सहमत आहे’ यावर टच करून OTP (वन टाइम पासवर्ड) पाठवा.
• ​आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला सहा अंकी OTP टाकून Submit करा.

पायरी 2: कुटुंबातील सदस्याची (पती/वडील) पडताळणी

• ​दुसरा पेज ओपन झाल्यावर:
• ​तुम्ही विवाहित असाल, तर पतीचा आधार क्रमांक टाका.
• ​तुम्ही अविवाहित असाल, तर वडिलांचा आधार क्रमांक टाका.
• ​पुन्हा कॅप्चा भरून ‘मी सहमत आहे’ यावर टच करा आणि ‘ओटीपी पाठवा’ बटनावर क्लिक करा.
• ​ज्यांचा आधार क्रमांक टाकला आहे (पती/वडील) त्यांच्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP टाकून Submit करा.

Ladki Bahin Yojana KYC Last Date
Ladki Bahin Yojana KYC Last Date: लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटचा दिवस

पायरी 3: आवश्यक माहिती भरणे आणि घोषणापत्र

• ​जात प्रवर्ग (Caste Category): ड्रॉप-डाऊनमधून तुमची जात प्रवर्ग (Cost) निवडा. (उदा. SC, ST, OBC, VJ, NT, EWS, ओपन, इ.)
• ​सरकारी कर्मचाऱ्याबाबत घोषणा:
• ​”माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात… कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत नाहीत
• ​या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ‘होय’ करायचे आहे. (अर्थात, तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नाहीत.)
• ​लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या:
• ​”माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.”
• ​तुमच्या घरात फक्त तुम्ही किंवा तुमच्या सोबत एकच अविवाहित/विवाहित महिला लाभ घेत असेल, तर या प्रश्नाला सुद्धा ‘होय’ करावे. (दोन विवाहित महिला लाभ घेत असल्यास नाही करावे लागेल.)
• ​अंतिम सबमिशन: खालील नियम आणि अटींवर (Term and Condition) टिक मार्क करा.
• ​Submit बटनावर टच करा.

पायरी 4: eKYC यशस्वी

• ​Submit केल्याबरोबर तुम्हाला “तुमची ई-केवायसी प्रक्रिया इथं पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” असा मेसेज दिसेल.
• ​या पद्धतीने तुमची ई-केवायसी अवघ्या काही मिनिटांत यशस्वी होते.

➡️ लाडकी बहीण योजना: eKYC झाली की नाही? ‘असे’ तपासा, नाहीतर थांबू शकतो हप्ता!

e pik pahani last date
e pik pahani last date: ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

Leave a Comment