पीएम किसान योजनेतील अर्ज प्रक्रिया सुरू, नवीन लाभार्थ्यांसाठी संधी PM Kisan Yojana new registration update

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमधून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. अजून देखील जे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत त्यांना या योजनेमध्ये जोडण्यासाठी सरकार कडून मोहीम राबवली जात आहे.

अनेक लाभार्थी शेतकरी पीएम किसान योजनेमध्ये सहभागी आहेत परंतु, आजही काही त्रुटींमुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित देखील आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने पुन्हा एकदा संधी दिली आहे. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत परंतु अद्याप या योजनेमध्ये सहभागी नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सरकारने दिली आहे. अशा शेतकऱ्यांचे मागील हप्ते मिळण्यास मदत होणार आहे. तसेच लाभार्थ्यांना पुन्हा योजनेमध्ये सहभागी होऊन लाभ घेता येणार आहे.

Senior Citizen Card 2026
जेष्ठ नागरिक कार्ड असे काढा ऑनलाईन, मिळतील अनेक लाभ Senior Citizen Card 2026

योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असाल पण अद्याप या योजनेमध्ये सहभागी नसाल तर, 15 एप्रिल 2025 पासून सरकार या योजनेअंतर्गत चौथी मोहीम सुरू करणार आहे. यामध्ये नवीन पात्र शेतकरी सहभागी केले जातील. म्हणजेच नवीन शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागेल. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सरकारद्वारे असलेल्या अटींची पूर्तता अर्जदाराने करायला हवी. यामध्ये शेतकऱ्याकडे शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे, आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे, तसेच पीएम किसान पोर्टलवर त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. या तीन अटींची पूर्तता करणाऱ्या नवीन लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो.

अर्ज कसा करावा?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पुढील प्रक्रियेचे अनुसरण करा

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

● सर्वप्रथम पीएम किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in/) भेट द्या.
● ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यावर क्लिक करा.
● तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल, आधार नंबर टाका आणि OTP द्वारे आपली पडताळणी पुर्ण करा.
● पुढे विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.
● काही दिवसानंतर तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या.

Leave a Comment