PM किसान योजनेत या तारखेपासून सुरू होणार नवीन नोंदणी प्रक्रिया, अर्ज कसा करावा ते जाणून घ्या PM Kisan Yojana New Registration 2025

PM Kisan Yojana New Registration 2025 – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शासनाने या शेतकऱ्यांना योजनेत पुन्हा सहभागी होण्याची संधी दिली आहे, त्यांना 2,000 रुपयांचा हप्ता देण्यात येईल. यासाठी 15 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल.

पंतप्रधान किसान योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमधून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपयांच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वितरित केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 19 हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे, एकूण 38,000 रूपयांची मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे. लवकरच 20 वा हप्ता देखील जाहीर केला जाईल.

मात्र, अनेक शेतकरी कागदपत्रांमधील त्रुटी, मालकी हक्कामधील बदल, बँक खात्यामधील चुका किंवा इतर विविध कारणांमुळे या लाभापासून वंचित राहिले आहेत. काही शेतकऱ्यांना केवळ सुरुवातीचे काही हप्ते मिळाले आणि नंतर बंद झाले. त्यामुळे अनेकांनी याबद्दल तलाठी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये पाठपुरावा केलेला होता.

या पार्श्वभूमीवर शासनाने योजनेमध्ये नवीन नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः लहान शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. अर्ज करतेवेळी शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमीन नोंदणी प्रणालीत नोंद केलेली असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक योजनेशी जोडलेले असायला पाहिजेत.

PM Kisan 20th Installment
PM Kisan 20th Installment: PM किसान 2000 हप्ता 2 ऑगस्टला जमा होणार – कृषी मंत्रालयाने केले जाहीर

अर्ज प्रक्रिया कशी कराल? PM Kisan Yojana New Registration 2025

शेतकरी ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने या योजनेत अर्ज करू शकतात. ऑनलाइन नोंदणीसाठी संकेतस्थळ: https://pmkisan.gov.in ला भेट द्या.

PM Kisan Yojana – ऑनलाइन अर्जाची पद्धत

● संकेतस्थळावर जा आणि ‘नवीन शेतकरी नोंदणी’ हा पर्याय निवडा.

● आपले राज्य, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक एंटर करा.

● मोबाईल क्रमांकावर येणारा OTP टाकून खाते तयार करा.

Check Ration Card List Online
Check Ration Card List Online: तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून पाहा 2 मिनिटांत

● वैयक्तिक माहिती, जमीन तपशील आणि बँक खाते यांची माहिती काळजीपूर्वक भरा, आणि अर्ज सबमिट करा.

PM Kisan Yojana – ऑफलाइन अर्जासाठी

तलाठी कार्यालय, कृषी सहायक कार्यालय किंवा कॉमन सेवा केंद्र (CSC) मध्ये जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता. सध्या नवीन अर्जदारांना मागील हप्ते मिळणार की नाही, याबाबत अद्याप सरकारकडून माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, आगामी लाभ निश्चित मिळवण्यासाठी ही शेतकऱ्यांना एक महत्त्वाची संधी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment