Gharkul Yojana: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, घरकुलासाठी सर्वसामान्य नागरिकांना मिळणार तब्बल ‘इतकं’ अनुदान!

Gharkul Yojana: भारताची अर्थव्यवस्था जगातील 5 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, परंतु आजही देशातीमधील असंख्य नागरिक बेघर असल्याचे पहायला मिळते. त्यामुळेच केंद्र सरकारकडून सर्वसामान्य बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. परंतु, पीएम आवास योजनेअंतर्गत जे अनुदान दिले जाते ते फारच कमी असून या अनुदानात घर कसे बनवायचे हा मोठा प्रश्न लाभार्थ्यांच्या पुढे निर्माण झाला होता.

यामुळे लाभार्थ्यांच्या माध्यमातून या अनुदाना संबंधित मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली होती. परंतु, आता या योजनेबाबत फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आता 50,000 रुपयांचे वाढीव अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य बेघर लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.

Ladki Bahin Yojana KYC Last Date
Ladki Bahin Yojana KYC Last Date: लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटचा दिवस

महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या नव्या निर्णयानुसार, आता PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांना 1,20,000 रुपये ऐवजी 1,70,000 रुपये इतके अनुदान मिळणार आहे. त्यातील 15,000 रुपये घरावर सौरउर्जा यंत्रणा उभारणीसाठी असतील. आम्ही आपणास सांगू इच्छितो की PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आता एकूण 2,09,000 रुपये इतके अनुदान मिळणार आहे.

फडणवीस सरकारच्या या नव्या निर्णयामुळे घरकूल लाभार्थींना आता  मूळ अनुदान म्हणून 1,20,000 रुपये, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 90 दिवसांच्या मजुरीपोटी 27,000 रुपये, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधणीसाठी 12,000 रुपये आणि ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार 50,000 रुपये वाढीव दिले जाणार आहेत. PM आवास योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला आता एकूण 2,09,000 रुपये सरकार कडून मिळतील, अशी माहिती समोर आलेली आहे.

e pik pahani last date
e pik pahani last date: ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

Leave a Comment