कृषी विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी, पगार 81,000/-, पहा पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Krushi Vidyapeeth Bharti 2025 – सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठात भरती सुरु झाली आहे. कृषी विद्यापीठातील गट क संवर्गात विविध पदे भरण्यासाठी भरती सुरु आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. कृषी विद्यापीठातील या भरतीसाठी (Krushi Vidyapeeth Bharti 2025) जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

कृषी विद्यापीठात (Krushi Vidyapeeth) कृषी सहाय्यक आणि इतर पदांची भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. कृषी सहाय्यक पदावर नियुक्ति होणाऱ्या उमेदवारास 25,500 ते 81,100 रुपये वेतन दिले जाईल. प्रत्येक पदासाठी आवश्यकतेनुसार आणि अनुभवानुसार वेतन मिळणार आहे.

Mukhyamantri Bal Aashirwad Yojana
Mukhyamantri Bal Aashirwad Yojana: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, दरमहा 4000 मिळणार – अशा कुठल्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही, आर्थिक नुकसानीस बळी पडू नका

कृषी विद्यापीठातील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. 18 पेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. चांगल्या विद्यापीठामध्ये पर्मनंट नोकरी करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करतेवेळी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये इतके शुल्क भरावे लागेल.

कनिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक या पदासाठी ही भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी पदवीधर आणि संबंधित क्षेत्रामधील डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. कृषी विद्यापीठातील या भरती अंतर्गत 71 पदे भरली जाणार आहेत. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ही ‘भरती केली जाईल. पात्र उमेदवार 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Ration card e-KYC update
Ration card e-KYC update: रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी नसेल तर नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत जाणार

Leave a Comment