PM Kisan 20th Installment Date 2025: PM किसान 20 वा हप्ता मिळणार की नाही? हे अशा प्रकारे तपासा!

PM Kisan 20th Installment Date 2025: PM किसान (PM Kisan Samman Nidhi Yojana) या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर दिली जाते. योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती. आतापर्यंत देशातील लाखो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

योजनेत आतापर्यंत 19 हप्ते वितरित केले आहेत. पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम (PM Kisan 20th installment) लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, मात्र केंद्र सरकारने अजून अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. तरीही तुम्ही लाभार्थी आहात का आणि हप्ता मिळणार आहे का, हे खालील पद्धतीने सहज चेक करू शकता.

तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का? हे तपासा: PM Kisan 20th installment status check

• अधिकृत वेबसाईटला भेट द्या:
https://pmkisan.gov.in
• ‘लाभार्थी यादी (Beneficiary List)’ या पर्यायावर क्लिक करा.
• तुमचं:
• राज्य (State)
• जिल्हा (District)
• तालुका/उपजिल्हा (Sub-District/Block)
• गाव (Village)
ही माहिती भरून ‘Get Report’ वर क्लिक करा.
• यानंतर तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल.

त्यामध्ये तुमचं नाव आहे का हे तपासा.

Maharashtra Rain Forecast
Maharashtra Rain Forecast: पाऊस लांबला; या तारखेनंतर पुन्हा मुसळधार

➡️ 7/12 Online Download: फक्त 2 मिनिटांत शेतजमिनीचा 7/12 उतारा मोबाईलवर फ्री डाउनलोड करा – संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

eKYC पूर्ण केली आहे का? हे फार महत्त्वाचं! How to update eKYC for PM Kisan Yojana

• OTP आधारित eKYC अनिवार्य केली गेली आहे.
• जर eKYC पूर्ण नसेल, तर तुमच्या खात्यावर हप्ता जमा होणार नाही.
• ऑनलाईन eKYC करण्यासाठी:
• https://pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
• ‘e-KYC’ या पर्यायावर क्लिक करा.
• तुमचा Aadhaar नंबर आणि मोबाईल OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा.

मागील हप्त्याचा लाभ मिळालाय का हे तपासा: How to Check PM Kisan Previous Installment Status Online

• वेबसाईटवर जा: https://pmkisan.gov.in
• ‘Know Your Status’ किंवा ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
• तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून माहिती पाहा.
• तिथं तुम्हाला हप्त्यांची तारीख आणि स्टेटस दिसेल.

जर नाव यादीत नसेल किंवा हप्ता मिळाला नसेल, तर काय कराल?

• जवळच्या CSC (Common Service Center) ला भेट द्या.
• आपल्या Aadhaar, बँक डिटेल्स व नोंदणी क्रमांकासह तक्रार नोंदवा.
• किंवा स्थानिक कृषी अधिकारी/ तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा.

Get education loan in 15 days
Get education loan in 15 days: फक्त 15 दिवसांत मिळणार एज्युकेशन लोन – आता बँकेत जाण्याची झंझट मिटली

PM Kisan 20th installment date 2025

PM Kisan योजनेचा 20 वा हप्ता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली eKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि जे लाभार्थी यादीत पात्र आहेत, त्यांच्याच खात्यावर हप्ता थेट जमा केला जाईल. त्यामुळे कोणतीही गडबड टाळण्यासाठी आपली PM किसान ई-केवायसी (PM Kisan eKYC) अपडेट आहे का ते नक्की तपासा, आणि वेळोवेळी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लाभार्थी स्थिती (Beneficiary Status) तपासत राहा.

➡️ घरकुल यादी मोबाईलवर कशी पहावी? जाणून घ्या सोपी पद्धत PMAYG beneficiary list check mobile

Leave a Comment