घरकुल यादी मोबाईलवर कशी पहावी? जाणून घ्या सोपी पद्धत PMAYG beneficiary list check mobile

PMAYG beneficiary list check mobile – घरकुल योजना लाभार्थी यादी मोबाईलवर पाहण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत येथे दिली आहे. घरकुल यादी मोबाईलवर सहज पाहा आणि तुमचं नाव शोधा.

प्रधानमंत्री आवास योजना – घरकुल योजनेची ओळख

गरीब व बेघर कुटुंबांना स्वतःचं पक्कं घर मिळावं यासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सुरू केली. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार मिळून आर्थिक मदत देतात. आधी जिथे ₹70,000 मदत मिळत होती, तिथे आता ती वाढवून ₹2.60 लाखांपर्यंत करण्यात आली आहे.

घराचे बांधकाम पूर्ण होताना टप्प्याटप्प्याने ही रक्कम दिली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या आणि पात्र ठरलेल्या कुटुंबांची यादी दरवर्षी प्रसिद्ध केली जाते. आता ही घरकुल यादी मोबाईलवर अगदी सहज पाहता येते.

➡️ Gharkul Yojana 2025 – नवीन अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या पात्रता व कागदपत्रांची संपूर्ण माहिती @pmayg.nic.in

घरकुल यादी मोबाईलवर कशी पाहावी?

ही यादी पाहण्यासाठी तुम्हाला कुठलेही अ‍ॅप डाऊनलोड करायची गरज नाही. खाली दिलेली सोपी स्टेप्स फॉलो करा:

Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या

तुमच्या मोबाईलच्या ब्राऊजरमध्ये https://pmayg.nic.in/netiay/home.aspx ही लिंक उघडा.

Maharashtra Rain Forecast
Maharashtra Rain Forecast: पाऊस लांबला; या तारखेनंतर पुन्हा मुसळधार

Step 2: Report पर्याय निवडा

वेबसाईट उघडल्यानंतर “AwaasSoft” या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर “Report” वर टॅप करा.

Step 3: लाभार्थी यादी शोधा

पृष्ठ खाली स्क्रोल केल्यानंतर “Social Audit Reports” वर क्लिक करा. आता “Beneficiary details for Verification” हा पर्याय निवडा.

Step 4: तुमची माहिती भरा

राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. योजनेचा प्रकार “PMAY-G” निवडा. कॅप्चा कोड भरून “Submit” वर क्लिक करा.

Step 5: यादी डाउनलोड करा

Get education loan in 15 days
Get education loan in 15 days: फक्त 15 दिवसांत मिळणार एज्युकेशन लोन – आता बँकेत जाण्याची झंझट मिटली

तुमच्या गावातील घरकुल लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर येईल. ती PDF किंवा Excel फॉर्मेटमध्ये सहज डाऊनलोड करता येते.

➡️ घरकुल पीएम आवास योजना मोबाईल वरून अर्ज करा – संपूर्ण मार्गदर्शक PMAY online application 2025

घरकुल यादी मोबाईलवर पाहण्याचे फायदे

• कुठेही जाता न एक क्लिकमध्ये यादी पाहता येते
• वेळ आणि कागदपत्रांची बचत
• अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी सुलभ उपाय
• लाभार्थ्याचं नाव तपासणं अगदी सोपं

PMAYG beneficiary list check ही प्रक्रिया आता अतिशय सोपी झाली आहे. यामुळे गरजूंना त्यांच्या हक्काच्या घरासाठी आवश्यक माहिती त्वरित मिळते. जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज केला असेल, तर वरील स्टेप्स वापरून आजच तुमचं नाव यादीत आहे की नाही ते तपासा!

➡️ घरकुल योजनेअंतर्गत लाखो घरांची मंजुरी – पहा तुमचं नाव यादीत आहे का? Gharkul labharthi Yadi 2025

Leave a Comment