PM Kisan 20th Installment: गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेच्या 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अखेर एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने अधिकृत घोषणा करत 20व्या हप्त्याच्या (PM Kisan 20th Installment) वितरणाची तारीख निश्चित केली आहे.
2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जमा होणार हप्ता
PM किसान योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये वितरित करण्यात आला होता. त्यानंतर 20व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहिली जात होती. याचदरम्यान सोशल मीडियावर आणि विविध वेबसाईट्सवर अनेक तर्क-वितर्क सुरू होते, परंतु अधिकृत माहिती नव्हती. आता कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता हा हप्ता (PM Kisan 20th Installment) शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे.
वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत वितरण
या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे दौऱ्यावर असणार आहेत. वाराणसीमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमातूनच या हप्त्याचे अधिकृत वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमात 9.3 कोटींहून अधिक शेतकरी बांधवांना आर्थिक मदत वितरित केली जाणार आहे.
PM किसान हप्ता स्टेटस कसा तपासायचा?
तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी खालील पद्धत वापरा:
• सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत संकेतस्थळावर जा (http://www.pmkisan.gov.in/)
• मुख्यपृष्ठावरील ‘Farmer Corner’ विभागात जा.
• तेथे ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा.
• त्यानंतर नोंदणी क्रमांक (Registration Number) टाका.
• जर तो क्रमांक माहीत नसेल, तर ‘Know Your Registration Number’ या लिंकवर क्लिक करा.
• आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन क्रमांक मिळवा.
• त्यानंतर Captcha कोड भरा आणि ‘Get OTP’ वर क्लिक करा.
• मोबाईलवर आलेला OTP टाकून ‘Get Data’ वर क्लिक करा.
• तुमच्या नावासह अर्जाची संपूर्ण माहिती दिसेल. तसेच हप्ता जमा झाला आहे का, याचा तपशीलही पाहता येईल.
महत्त्वाचे: जर अर्जामधील माहिती चुकलेली असेल किंवा काही अपडेट करायचे असतील, तर ‘Update Your Details’ या बटणावर क्लिक करून आवश्यक बदल करणे शक्य आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासा – खरीप हंगामात मिळणार आर्थिक आधार
PM-Kisan योजना देशभरातील छोट्या व सीमांत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये एकूण 6,000 रूपयांची थेट आर्थिक मदत बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे बियाणं, खते, कीटकनाशके यांसारख्या शेतीसंबंधित खर्चात मदत होते.
2 ऑगस्ट रोजी मिळणार 20वा हप्ता
शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात एक मोठा दिलासा ठरणार आहे. अनेकांना खरीप पीक खर्चासाठी या पैशाचा उपयोग करता येणार आहे. सरकारकडून वेळेवर मिळणारी ही रक्कम शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावते.
जर तुम्ही अद्याप PM Kisan योजनेसाठी नोंदणी (PM Kisan Registration) केलेली नसेल, तर लवकरात लवकर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती भरून अर्ज सादर करा. योजनेच्या लाभासाठी नियमितपणे खाते तपासा आणि आवश्यक असल्यास माहिती अपडेट करत रहा.
➡️ तुम्हाला PM किसान 20 वा हप्ता मिळणार की नाही? हे अशा प्रकारे तपासा!