ऑफिसमध्ये पाणी पिण्याचीही भीती! Viral Video मधील धक्कादायक आणि किळसवाणी घटना

Office Water Viral Video – सध्या कडक उन्हाळा सुरु असल्यामुळे प्रत्येकालाच खूप तहान लागते. घरून नेलेली पाण्याची बाटली ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत संपून जाते, पण तहान काही पूर्ण होत नाही; जेव्हा आपण ऑफिसमध्ये पोहोचतो तेव्हा आधी बॅग ठेवतो आणि लगेच वॉटर डिस्पेंसरमधील बाटली भरून पाणी पितो.

पण, तुम्ही ज्या वॉटर डिस्पेंसरमधून पाणी पित आहात ते स्वच्छ आहे का? याचा कधी विचार केला आहे का. नसेल तर आजपासून करा… कारण सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला आता ऑफिसमधल्या वॉटर डिस्पेंसरमधील पाणी प्यायचे की नाही असा प्रश्न नक्कीच पडेल.

ऑफिसमधल्या वॉटर डिस्पेंसरमधील पाणी स्वच्छ आहे असे समजून आपण ते पित असतो. पण, ते खरंचं स्वच्छ आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे; कारण ऑफिस बंद असताना रात्रीच्या वेळी त्यावर किती किटाणू, उंदीर फिरत असतील याचा विचारही आपण करत नाही. पण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला याबद्दलची माहिती येईल.

Maharashtra Rain Forecast
Maharashtra Rain Forecast: पाऊस लांबला; या तारखेनंतर पुन्हा मुसळधार

व्हायरल व्हिडीओमध्ये एक बंद ऑफिस आहे, जिथे इतर ऑफिसेसच्या डेक्सप्रमाणे प्रिंटर, कॉम्प्युटरपासून सर्व वस्तू पाहायला मिळत आहेत. याचवेळी तिथे कर्मचाऱ्यांसाठी भिंतीजवळ एक वॉटर डिस्पेंसर ठेवला आहे. यावेळी एका डेस्क जवळून उंदीर धावत येऊन डिस्पेंसर मशीनवर चढतो. आणि मशीनच्या नळाला तोंड लावून पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. काही सेकंद तो तेथेच थांबून नंतर पळून जातो. ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झाला आहे.

पाहा व्हिडिओ – येथे क्लिक करा

@gut.health.hub या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलेला आहे. यावर लोकांच्या अनेक प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. काहींनी म्हटले आहे की, अशा प्रकारामुळे ऑफिसमधील कर्मचारी आजारी पडू शकतात, कर्मचाऱ्यांना उंदरांमुळे रोग होऊ शकतात. तर एकाने म्हटले की, म्हणून मी ऑफिसमध्ये नेहमी स्वत:चा डब्बा आणि पाण्याची बाटली घेऊन जातो. तर काहींनी म्हटले की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता चुकूनही कधीच ऑफिसमधील पाणी पिणार नाही.

Get education loan in 15 days
Get education loan in 15 days: फक्त 15 दिवसांत मिळणार एज्युकेशन लोन – आता बँकेत जाण्याची झंझट मिटली

Leave a Comment