EMI शिवाय मिळवा खास कर्ज, पर्सनल लोनपेक्षा स्वस्त पर्याय, संपूर्ण माहिती जाणून घ्या

Loan Without EMI – प्रत्येकाला आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये पैशांची गरज भासते त्यावेळी लोक क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोनचा पर्याय निवडतात. क्रेडिट कार्डवरून शॉर्ट टर्ममध्ये लोन घेता येऊ शकते. पर्सनल लोन हे लाँग टर्मसाठी उत्तम आहे. परंतु, पर्सनल लोनचे व्याजदर खूप जास्त आहेत त्यामुळे दरमहा EMI भरण्याचा ताण डोक्यावर जास्त पडतो.

परंतु, पर्सनल लोनपेक्षाही स्वस्त मिळणारे कर्ज आहे आणि त्यामध्ये EMI चा भार जास्त नाही. याची परतफेड प्रणाली खुप सोपी असून आपल्याला सोयीनुसार कर्जाची परतफेड करता येऊ शकते. बहुतेक लोकांना याची माहिती नाही. या कर्जाबद्दल येथे सविस्तर जाणून घेऊया.

LIC आपल्या सर्व पॉलिसींवर कर्ज सुविधा देते. जर तुमच्याकडे LIC पॉलिसी असेल आणि त्यावर कर्जाची सुविधा असल्यास तुम्ही कठीण काळात कर्जाची व्यवस्था करू शकता. या कर्जासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यक्ता नाही आणि ग्राहकाला कर्जाची रक्कम कमीत कमी वेळेत, म्हणजेच 3 ते 5 दिवसांमध्ये मिळू शकते.

किती आकारले जाते व्याज?

LIC वरील कर्ज घेण्याचा एक फायदा म्हणजे आपल्याला आपली पॉलिसी सरेंडर करावी लागत नाही. यावेळी विम्यातून मिळणारे फायदे संपत नाहीत. तसेच पर्सनल लोनपेक्षा हे लोन स्वस्त आहे. ते घेताना कोणतीही प्रोसेसिंग फी किंवा हिडन फी आकारली जात नाही. अशा वेळी कर्जाचा अधिकचा खर्च वाचतो. सर्वसाधारणपणे LIC कर्ज 9% ते 11% व्याज दराने दिले जाते, तर वैयक्तिक कर्जावर 10.30% ते 16.99% पर्यंत व्याज आकारले जाऊ शकते.

Maharashtra Rain Forecast
Maharashtra Rain Forecast: पाऊस लांबला; या तारखेनंतर पुन्हा मुसळधार

परतफेड सोपी

LIC पॉलिसीवर कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड खुप सोपी आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी चांगला कालावधी दिला जातो. हा कालावधी किमान 6 महिन्यांपासून विमा पॉलिसीच्या मॅच्युरिटीपर्यंत असू शकतो. अशा प्रकारे ग्राहकासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे या कर्जावर दरमहा EMI भरण्याचा कोणताही ताण नाही. पैसे जमा होत असल्यामुळे त्यानुसार पैसे भरता येऊ शकतात. दरम्यान, यामध्ये वार्षिक व्याजाची भर पडत राहील, ही बाब लक्षात ठेवा. जर, एखाद्या ग्राहकाने किमान 6 महिन्यांच्या काळात कर्जाची परतफेड केल्यास त्याला 6 महिन्यांच्या संपूर्ण कालावधीसाठी व्याज द्यावे लागेल.

किती मिळेल कर्ज?

यामध्ये कर्जाची परतफेड 3 प्रकारे करता येऊ शकते.

1 – संपूर्ण मुद्दल व्याजासह परत करा.
2 – LIC पॉलिसीच्या मुदतपूर्ती वेळी दाव्याच्या रकमेसह मूळ रकमेचा निपटारा करा. यावेळी तुम्हाला फक्त व्याजाची रक्कम भरावी लागेल.
3 – वार्षिक व्याजाची रक्कम भरा आणि मूळ रक्कमेचा वेगळ्या पद्धतीने निपटारा करा.

LIC मधील कर्जाची रक्कम सरेंडर व्हॅल्यूनुसार ठरवतात. पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूच्या 80% ते 90% कर्ज मंजूर होऊ शकते.

Get education loan in 15 days
Get education loan in 15 days: फक्त 15 दिवसांत मिळणार एज्युकेशन लोन – आता बँकेत जाण्याची झंझट मिटली

LIC पॉलिसीवर दिले जाणारे कर्ज सुरक्षित कर्ज आहे. कर्जाची परतफेड न झाल्यास किंवा कर्जाची थकित रक्कम पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूपेक्षा अधिक असल्यास कंपनीला आपली पॉलिसी रद्द करता येते, तसा त्यांना अधिकार आहे. कर्जाची परतफेड करण्याआधी जर तुमची इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युअर झाली तर यावेळी विमा कंपनी तुमच्या रकमेतून कर्जाची रक्कम कपात करू शकते.

Leave a Comment