New Ration Card Required Documents 2025: नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी आणि अर्ज प्रक्रिया

New Ration Card Required Documents 2025: रेशन कार्ड हे केवळ धान्य मिळवण्यासाठीचे साधन नाही, तर ते एक महत्त्वाचे ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. शासनाच्या विविध योजना, शिष्यवृत्ती, घरकुल योजना, शालेय साहित्य, तसेच स्वस्त दरात धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्ड महत्वाचे आहे. जेव्हा नवीन कुटुंब तयार होते, विभाजनानंतर मुलांना स्वतंत्र रेशन कार्ड हवे असते, किंवा जुन्या रेशन कार्डातील माहिती बदलायची असते, तेव्हा नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करावा लागतो

परंतु नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करताना अनेकदा लोकांना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात याची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे अर्ज करताना अपूर्ण कागदपत्रांमुळे अर्ज प्रलंबित राहू शकतो किंवा नाकारला जाऊ शकतो. चला तर मग पाहूया, नवीन रेशन कार्डसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी आणि अर्ज करण्याची पद्धत

New Ration Card Required Documents 2025

1. ओळख पुरावा (Identity Proof)

खालील पैकी कोणतेही एक कागदपत्र ओळख पुराव्यासाठी सादर करावे लागते:

• पासपोर्ट
• आधार कार्ड
• मतदार ओळखपत्र (Voter ID)
• पॅन कार्ड
• ड्रायव्हिंग लायसन्स

2. पत्त्याचा पुरावा (Address Proof)

पत्त्याचा पुरावा देण्यासाठी खालीलपैकी एक कागदपत्र आवश्यक आहे:

Mahavitran Smart Meter
लाईट गेल्यास महावितरणला फोन करायची कटकट संपणार! ‘हा’ नवीन स्मार्ट पर्याय सुरू Mahavitran Smart Meter

• पाणी बिल
• घराची टॅक्स पावती
• ‘सातबारा’ व ‘8अ’ उतारा
• वीज बिल
• आधार कार्ड
• पासपोर्ट
• बँक पासबुकवरील पत्ता
• टेलिफोन बिल
• गॅस कनेक्शन बिल

3. वयाचा पुरावा (Age Proof)

• जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
• प्राथमिक शाळेचा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)

4. कौटुंबिक सदस्यांचे ओळखपत्र (Family Members’ ID Proof)

• प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड
• प्रत्येक सदस्याचा जन्म दाखला
• विवाह प्रमाणपत्र (असल्यास)

5. उत्पन्नाचा पुरावा (Income Proof)

• तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला

6. स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) – आवश्यक असल्यास

7. महाराष्ट्र रहिवासी दाखला (Domicile Certificate) – आवश्यक असल्यास

8. सर्व सदस्यांचे पासपोर्ट साईज फोटो

अर्ज करण्याची पद्धत (Ration Card Application Process)

ऑफलाईन अर्ज

ऑफलाईन अर्जासाठी तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयात, नगरपरिषदेत, ग्रामपंचायतीत किंवा नागरी पुरवठा कार्यालयात जाऊन रेशन कार्डसाठी अर्ज भरू शकता. अर्ज भरताना वरील सर्व कागदपत्रांची मूळ व छायांकित प्रती सोबत घ्याव्यात

CM Fellowship Yojana 2026 registration
मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2026: या तारखेपर्यंत करा नोंदणी, असा घ्या लाभ CM Fellowship Yojana 2026 registration

ऑनलाईन अर्ज

तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास mahafood.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तेथे ‘नवीन रेशन कार्ड अर्ज’ हा पर्याय निवडून आवश्यक माहिती भरून, कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करून अर्ज पूर्ण करता येतो

काही महत्त्वाच्या टिपा (New Ration Card Required Documents 2025)

• अर्ज करताना सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि अद्ययावत असावीत
• ऑनलाईन अर्ज करताना स्कॅन केलेली कागदपत्रे PDF किंवा JPEG फॉरमॅटमध्ये असावीत
• सर्व सदस्यांची नावे व तपशील अचूक भरले गेले पाहिजेत, अन्यथा नंतर बदल करणे कठीण होऊ शकते

अशा पद्धतीने, योग्य कागदपत्रे आणि माहिती सोबत ठेवल्यास नवीन रेशन कार्ड काढण्याची प्रक्रिया सहज आणि जलद पूर्ण होऊ शकते

➡️ तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून पाहा 2 मिनिटांत

Leave a Comment