Digital Crop Survey Maharashtra: ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो? – पहा नविन नियम

Digital Crop Survey Maharashtra: कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला असून, आता पिकांची पाहणी देखील डिजिटल पद्धतीने होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात खरीप हंगामातील ई-पीक पाहणी (Digital Crop Survey) करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे

ई-पीक पाहणीचा कालावधी

• शेतकरी स्तरावर: 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2025
• सहायक स्तरावर: 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर 2025

यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी सांगितले जात आहे, जेणेकरून वेळेत आणि अचूक माहिती सरकारकडे पोहोचेल

फोटो किती अंतरावरून घ्यायचा?

डिजिटल क्रॉप सर्व्हे अ‍ॅपमध्ये पिकांची नोंदणी करताना शेतीच्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत पिकांचा फोटो घ्यावा लागेल. हा फोटो अ‍ॅपमध्ये थेट अपलोड करायचा आहे, ज्यामुळे स्थानिक पिकांची माहिती जीपीएस लोकेशनसह नोंदवली जाईल

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

शेतकऱ्यांसाठी मदत व्यवस्था

प्रत्येक गावात पिक नोंदणीसाठी एक सहायक नेमण्यात आला आहे. हे सहायक शेतकऱ्यांना अ‍ॅपचा वापर करून पीक पाहणी करण्यास मदत करतील. तथापि, शासनाचा स्पष्ट सल्ला असा आहे की शेतकऱ्यांनी सहायकांवर अवलंबून न राहता नोंदणी स्वतःच पूर्ण करावी

अ‍ॅपची अद्ययावत आवृत्ती (Digital Crop Survey App)

• डिजिटल क्रॉप सर्व्हे अ‍ॅपचे व्हर्जन 4.0.0 अपडेट केले गेले आहे
• हे अ‍ॅप Google Play Store वर उपलब्ध आहे
• नोंदणी सुरू करण्यापूर्वी अ‍ॅप अपडेट करणे आवश्यक आहे, जेणेकरून नवीन सुविधा वापरता येतील

ई-पीक पाहणी प्रकल्पाचा इतिहास

महाराष्ट्रात ई-पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात 15 ऑगस्ट 2021 रोजी झाली. गेल्या वर्षाच्या रब्बी हंगामापासून संपूर्ण राज्यात हा प्रकल्प पूर्णपणे डिजिटल क्रॉप सर्व्हे अ‍ॅपद्वारे राबवला जात आहे. यामुळे कागदी नोंदींच्या तुलनेत वेग, पारदर्शकता आणि अचूकता वाढली आहे

महत्वाचे मुद्दे (E-Crop Inspection Maharashtra)

• पिकांचा फोटो 50 मीटरच्या आतून घ्यावा
• फोटो अ‍ॅपमधून थेट अपलोड करावा
• अ‍ॅप अपडेट करून नंतरच नोंदणी करावी
• शक्य तितकी नोंदणी शेतकऱ्यांनी स्वतः करावी
• कालावधीमध्ये नोंदणी करने अत्यंत गरजेचे

ladki bahin yojana june installment date 2026
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, जून महिन्याचा हप्ता जमा होणार, शासन निर्णय आला ladki bahin yojana june installment date 2026

Digital Crop Survey Maharashtra

सरकारचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी डिजिटल युगात एक मोठे पाऊल आहे. यामुळे पिकांची वास्तविक स्थिती अचूकपणे नोंदवली जाईल आणि पुढील कृषी नियोजनात मदत होईल

➡️ ई-पीक पाहणी झाली का? मोबाईलवर घरबसल्या स्टेटस तपासा या सोप्या पद्धतीने!

Leave a Comment