ई-पीक पाहणी झाली का? मोबाईलवर घरबसल्या स्टेटस तपासा या सोप्या पद्धतीने! How to Check E-Pik Pahani Status

E-Pik Pahani – सरकारच्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळावा आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना लगेच मिळावी यासाठी ‘पीक पाहणी योजना’ सुरू करण्यात आली. रब्बी हंगाम सन 2024 आणि 2025 साठी 15 जानेवारी 2025 पर्यंत शेतकरी स्वतः नोंदणी करू शकत होते, त्यानंतर सहाय्यक स्तरावरील नोंदणी प्रक्रिया दिनांक 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यान पूर्ण करण्यात आली. आपली ई-पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी आणि ई-पिक पाहणीची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता तलाठ्यांकडे जाण्याची गरज नाही, ते आपल्या ई-पिक पाहणीची स्थिती मोबाईल वरून पाहू शकतात.

ई-पीक पाहणी नोंदणी आपल्या मोबाईल वरुन कशी करायची? E-Pik Pahani Registration

ई-पीक पाहणी नोंदणी आपल्या मोबाईल वरुन करण्यासाठी खालील प्रक्रियेचे अनुसरण करा.

● प्रथम प्ले स्टोअर वरून ‘ई-पीक पाहणी ॲप‘ डाऊनलोड करा.
● ॲप ओपन करून तुमच्या महसूल विभागाची निवड करा आणि पुढे जा.
● तुमचा मोबाईल नंबर टाका.
● आता तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव याची निवड करून पुढे जा.
● यानंतर तुमचे नाव, खाते क्रमांक, गट क्रमांक इत्यादी विचारलेली माहिती भरून ‘शोधा’ वटनावर क्लिक करा.
● यानंतर खातेदाराची निवड करा.
● आता तुमचे खाते निवडा आणि पुढे जा.
● पीक पेरणीची माहिती भरून पिकांची निवड करा.
● नंतर पिकांसाठी ‘सिंचन साधन आणि प्रकार’ निवडा.
● नंतर पिकांचे फोटो अपलोड करा.
● तुमच्या पिकांचे अक्षांश रेखांश सहित उभ्या पिकाचे फोटो अपलोड करा.
● अशाप्रकारे ई-पीक पाहणी अंतर्गत तुमची पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

Maharashtra Rain Update
24 ते 28 जून दरम्यान राज्यात तुफान पाऊस! अतिवृष्टीमुळे धरणे भरणार, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज Maharashtra Rain Update

ई-पीक पाहणीची स्थिती आपल्या मोबाईलवरून अशी तपासा How to Check E-Pik Pahani Status

आपली ई-पिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का? हे तपासण्यासाठी खालील प्रक्रियेचे अनुसरण करा

● प्रथम ‘ई-पिक पाहणी ॲप’ प्ले-स्टोअर वरून डाऊनलोड करा.
● यानंतर ‘गावच्या खातेदारांची पीक पाहणी’ या पर्यावर क्लिक करा.
● त्यानंतर गावातील सर्व शेतकऱ्यांची यादी तुम्हाला दिसेल
ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी यशस्वीरित्या झाली असेल अशा शेतकऱ्यांची नावे हिरव्या कलर मध्ये तुम्हाला दिसतील.
● आणि ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी अजूनही झाली नाही, अशा शेतकऱ्यांची यादी पांढऱ्या रखान्यामध्ये तुम्हाला दिसेल.

तुमची ई-पीक पाहणी झाल्यानंतर कमीत कमी 48 तासानंतरच तुमचे नाव ई-पीक पाहणीच्या लिस्टमध्ये जोडले जाईल. 48 तासांच्या कालावधीनंतर किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये तुमचे ई-पिक पाहणी यादीत नाव आले नसल्यास तुमची पिक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झाली नाही असे समजावे.

Sarkari Loan Yojana 2026
सरकारच्या 5 सर्वोत्तम कर्ज योजना: बिनव्याजी आणि मोठ्या सबसिडीवर मिळवा कर्ज! Sarkari Loan Yojana 2026

Leave a Comment