Ghibli फोटो तयार करत आहात, एका चुकीने बँक खाते होईल रिकामे

Ghibli Photo Trend – सायबर चोरटे लोकांना लुटण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. त्यातच सोशल मीडियावरती Ghibli फोटो तयार करण्याचा ट्रेंड सुरु आहे. अनेक जण Ghibli स्टाइल फोटो तयार करत आहेत. मात्र, Ghibli फोटो तयार करताना तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे Ghibli स्टाइल फोटो तयार करतेवेळी सावध राहण्याची गरज आहे.

Ghibli स्टाइल फोटो तयार करण्यावरून अनेक एक्सपर्टनी चिंता व्यक्ती केली आहे. Ghibli स्टाइल फोटो तयार करण्याच्या नादात युजर्स त्यांची फेशियल डिटेल्स दुसऱ्या वेबसाईटला शेअर करत आहेत. यावेळी तुमची संपूर्ण माहिती सायबर स्कॅमर्सपर्यंत पोहचू शकते. ही बाब तुमच्यासाठी धोक्याची असल्यामुळे याची माहिती तुम्हाला असायला हवी.

ChatGPT व्यतिरिक्त अनेक ॲप आणि पोर्टल Ghibli स्टाइल फोटो तयार करत आहेत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्कॅमर्स देखील बनावट वेबसाइट द्वारे तुमची फसवणूक करू शकतात.

Maharashtra Rain Forecast
Maharashtra Rain Forecast: पाऊस लांबला; या तारखेनंतर पुन्हा मुसळधार

वेबसाइट आणि टूल्स

तुम्ही चॅटजीपीटी ऐवजी दुसरी वेबसाइट आणि टूल्सचा वापर करून Ghibli फोटो तयार करत असल्यास तुम्हाला सतर्क राहण्याची आवश्यक्ता आहे. अनेकजण समजत असतील की तुम्ही फक्त एक फोटो तयार करत आहात, मात्र ही बाब फक्त Ghibli पर्यंत मर्यादित नाही. तुम्ही खरंतर यावेळी दुसऱ्या प्लॅटफॉर्मला फेशियल डिटेल्स देत आहात.

फेस डिटेल्सच्या माध्यमातून होऊ शकते फसवणूक

बनावट वेबसाईटवरून Ghibli स्टाइल फोटो तयार करण्याच्या नादामध्ये तुमच्या फेस डिटेल्सच्या माध्यमातून सायबर चोरटे तुमची फसवणूक करू शकतात. फेशियल डिटेल्सच्या माध्यमातून अनेकांचा फोन अनलॉक होऊ शकतो. या माहितीच्या आधारे स्कॅमर्स तुमचा फोन अनलॉक करू शकतात आणि आर्थिक फसवणूक करु शकतात. तसेच यामुळे ते वेगवेगळ्या डिजिटल सर्व्हिसचा वापर करू शकतात. एकंदरीत फेशियल डिटेल्सच्या माहितीमुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते.

सायबर चोरट्यांना तुमच्या फेशियल डिटेल्सचा वापर करून तुमचे ॲप अनलॉक करता येऊ शकते. तसेच तुमच्या UPI Pin चा वापर करून ते पैसे ट्रान्सफर करू शकतात. त्यामुळे Ghibli फोटो तयार करताना अधिकृत वेबसाईचाच वापर करा. बनावट वेबसाइटच्या माध्यमातून Ghibli फोटो तयार करत असल्यास तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे.

Get education loan in 15 days
Get education loan in 15 days: फक्त 15 दिवसांत मिळणार एज्युकेशन लोन – आता बँकेत जाण्याची झंझट मिटली

Leave a Comment