मोदी सरकारची महिलांसाठी खास योजना! फक्त 5% व्याजदरावर 2 लाखांचं कर्ज, पहा नियम आणि अटी Swarnima Scheme For Women

Swarnima Scheme For Women – महिला उद्योजकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. स्वर्णिमा योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या 5% व्याजदराने मिळणार आहे. व्यवसायाला सुरुवातीची कोणतीही गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ही चांगली संधी आहे. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा मार्फत स्वर्णिमा योजना राबवली जात आहे.

स्वर्णिमा योजना मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यांसारख्या उपक्रमांना पूरक असून, महिला उद्योजकांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. महिला उद्योजकांनी या योजनेअंतर्गत लाभ घेऊन आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा! या योजनेसाठी अर्ज कसा करावा, काय आहेत नियम अटी येथे जाणून घेऊया सविस्तर.

योजनेची वैशिष्ट्ये

● ही योजना मागासवर्गीय (Backward Classes) महिला उद्योजकांसाठी आहे.

● योजनेमधून महिलांना 12 लाखांपर्यंतचे कर्ज फक्त 5% वार्षिक व्याजदराने मिळू शकते.

● या कर्जाचा उपयोग स्वयंरोजगारासाठी (Self-Employment) करता येणार आहे.

● या योजनेच्या अंतर्गत महिलांना स्वतः कोणताही भांडवली खर्च उभारण्याची गरज नाही. म्हणजेच, 12 लाखांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी महिलांना स्वतःकडून पैसे गुंतवण्याची आवश्यक्ता नाही.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

फायदे

● कमी व्याजदरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उपलब्ध होईल.

● मागासवर्गीय महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुवर्णसंधी आहे.

● महिला सशक्तीकरणाला चालना मिळेल.

● समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील महिलांसाठी आर्थिक स्थैर्य मिळेल.

पात्रता निकष

● योजनेअंतर्गत अर्जदार महिला असावी.
● वय 18 ते 55 वर्षांदरम्यान असणे आवश्यक.
● महिला उद्योजक असावी (स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी असावी).
● वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹3 लाखांपेक्षा अधिक नसावे.

अर्ज करण्याची प्रक्रिया (फक्त ऑफलाइन माध्यमातून)

● नजीकच्या SCA कार्यालयात भेट द्या – इच्छुक महिलांनी राज्य वाहिनीकृत एजन्सी (SCA) च्या कार्यालयात जाऊन ‘स्वर्णिमा योजना’ साठी अर्ज करावा. (तुमच्या जवळच्या SCA कार्यालयाचा पत्ता येथे पाहता येईल: https://nsfdc.nic.in/channel-patrners/scas)

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

● अर्ज भरून माहिती द्या – अर्जामध्ये व्यवसायासाठी आवश्यक माहिती, व्यवसायाची संकल्पना आणि प्रशिक्षणाची आवश्यक्ता असेल तर ती नमूद करावी.

● अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर करा – अर्ज भरल्यानंतर तो SCA कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसोबत सादर करावा. त्यानंतर अर्जाची छाननी होऊन संबंधित संस्थेकडून कर्ज मंजूर केले जाईल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

● आधार कार्ड (ओळखपत्र)
● शिधापत्रिका (Ration Card)
● रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
● जात प्रमाणपत्र (Caste Certificate) – आरक्षित प्रवर्गासाठी
● अर्जदार महिलेचा पासपोर्ट साईज फोटो

महिला सशक्तीकरणासाठी उत्तम संधी !

ही योजना मागासवर्गीय महिलांना आर्थिक स्वायत्तता मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. योजनेमधुन कमी व्याजदरावर कर्ज घेऊन महिलांना आपला व्यवसाय सुरू करता येतो आणि त्या आत्मनिर्भर होऊ शकतात. इच्छुक महिलांनी लवकरात लवकर अर्ज करा आणि या संधीचा लाभ घ्या!

Leave a Comment