दहावी बारावीचे मूळ गुणपत्रक विद्यार्थ्यांना या तारखेपासून मिळणार SSC HSC Original Marksheet 2025

SSC HSC Original Marksheet 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी आणि दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गुणपत्रकाची प्रत शाळा व महाविद्यालयांमधून कधी मिळणार, हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागून आहे.

बारावीचे मूळ गुणपत्रक कधी मिळणार?

राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, 16 मे 2025 पासून शाळा आणि महाविद्यालयांमधून बारावीच्या मूळ गुणपत्रकांचे वाटप सुरू होणार आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, लातूर, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

मुलींची निकालात आघाडी कायम

यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58% तर मुलांची 89.51% आहे. म्हणजेच मुलींच्या निकालात 5.07% ची वाढ दिसून आली आहे. हे यश प्रेरणादायी ठरत आहे.

Maharashtra Rain Forecast
Maharashtra Rain Forecast: पाऊस लांबला; या तारखेनंतर पुन्हा मुसळधार

दहावीचे मूळ गुणपत्रक कधी मिळणार?

13 मे रोजी जाहीर झालेला दहावीचा निकाल सुद्धा ऑनलाईन स्वरूपात जाहीर करण्यात आला. साधारणतः कोणताही बोर्डाचा निकाल लागल्यानंतर 7-8 दिवसांमध्ये मूळ गुणपत्रक शाळांमध्ये वितरीत केले जाते. त्यामुळे 20-21 मेच्या दरम्यान दहावीचे गुणपत्रक विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

लातूर पॅटर्नची पुन्हा चर्चा

दहावीच्या निकालात लातूर विभागातील 113 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले, ज्यामुळे लातूर पॅटर्न पुन्हा चर्चेत आला आहे. एकूण मुलींची टक्केवारी 96.14% असून मुलांची 92.31% आहे.

SSC HSC Original Marksheet 2025 मिळण्यासाठी फारशी प्रतीक्षा उरलेली नाही. बारावीचे गुणपत्रक 16 मेपासून तर दहावीचे पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. हे गुणपत्रक पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत शाळा किंवा महाविद्यालयात जाऊन आपले मूळ गुणपत्रक घेणे गरजेचे आहे.

Get education loan in 15 days
Get education loan in 15 days: फक्त 15 दिवसांत मिळणार एज्युकेशन लोन – आता बँकेत जाण्याची झंझट मिटली

Leave a Comment