SBI ATM Rules – जर तुमचे खाते SBI मध्ये आहे आणि तुम्हाला एटीएमचा वापर वारंवार करावा लागत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खुप महत्त्वाची आहे. 1 फेब्रुवारी 2025 पासून SBI ने ATM व्यवहारांसंबंधित नवे नियम लागू केले आहेत, जे देशामधील SBI च्या सर्व ग्राहकांवर सारखेच लागू होतील. मग तुम्ही राहण्यासाठी मेट्रो शहरात किंवा गावात कुठेही असाल.
ATM व्यवहारांची मर्यादा काय आहे?
● SBI च्या ATM वर मासिक 5 व्यवहार मोफत दिले आहेत.
● इतर बँकांच्या ATM वरून एकूण 10 मोफत व्यवहार करता येतील.
● म्हणजे एकूण मिळून 15 व्यवहार मोफत आहेत.
जर तुमच्या खात्यामध्ये मासिक सरासरी बँलेंस 1 लाख किंवा त्याहून अधिक असल्यास, तुम्हाला अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा दिली जाईल, यावेळी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
मर्यादा ओलांडल्यास दंड किती?
जर व्यवहारांच्या मर्यादेपलीकडे तुम्ही लिमिट ओलांडले, तर:
● SBI च्या ATM वर: 15 रुपये + GST अतिरिक्त आकारण्यात येतो.
● इतर बँकांच्या ATM वर: 21 रुपये + GST अतिरिक्त आकारण्यात येतो.
परंतु, SBI च्या ATM वरून शिल्लक पाहण्यासाठी किंवा मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी कोणताही शुल्क आकारले जाणार नाही.
पण हे इतर बँकेच्या ATM वर करण्यासाठी 10 रुपये + GST आकारला जाईल.
जर खात्यामध्ये पैसे कमी असतील आणि व्यवहार फेल झाला तर?
अशा वेळी SBI कडून 20 रुपये + GST दंड म्हणून आकारला जातो. हा नियम पूर्वीपासून लागू आहे आणि त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही.
RBI चे 1 मे 2025 पासून लागू होणारे नवीन नियम
1 मे 2025 पासून RBI चे सुधारित नियम लागू करण्यात येतील. त्यानुसार, जर एखाद्या ग्राहकाने आपली फ्री लिमिट ओलांडून पैसे काढले, तर तेव्हा त्याला प्रत्येक अधिकच्या ट्रान्झॅक्शनसाठी 23 रुपयेपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते.
डिजिटल व्यवहार करा, वेळ आणि पैसा वाचवा
SBI ने हा निर्णय डिजिटल बँकिंग सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी घेतला आहे. ग्राहकांनी UPI, इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल अॅपचा वापर अधिक प्रमाणात करावा, कारण या माध्यमाद्वारे व्यवहार करतेवेळी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही आणि वेळ देखील वाचतो.
Disclaimer: वरील लेखामधील सर्व माहिती ही SBI आणि RBI कडील उपलब्ध माहितीप्रमाणे तयार केलेली आहे. व्यवहाराच्या अटी, शुल्क किंवा सुविधा बदलू शकतात. त्यामुळे बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा बँक शाखेमध्ये जाऊन तपशीलवार माहिती घ्यावी. कोणताही आर्थिक निर्णय घेण्याआधी स्वतःचा विचार किंवा योग्य सल्लागाराचा सल्ला या गोष्टी आवश्यक आहेत.