Pradhan Mantri Awas Yojana eligibility: एकाच घरातील दोन भावांना घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pradhan Mantri Awas Yojana eligibility: आजच्या घडीला आपल्या देशात अजूनही असे लाखो नागरिक आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे हक्काचे घर नाही. विशेषतः ग्रामीण भागात अनेक कुटुंबे अजूनही मातीची घरे, झोपड्या किंवा तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 2015 साली प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सुरू केली. प्रत्येकाला हक्काचे घर देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

ही योजना दोन प्रकारात राबवली जाते:

• प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)
• प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

ही योजना गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निम्न व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचे काम करते.

पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी आणि नियम निश्चित केले आहेत. यामध्ये काही प्रमुख अटी पुढीलप्रमाणे आहेत:

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

• अर्जदाराने याआधी सरकारच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
• अर्जदाराचे कुटुंब फक्त पती, पत्नी आणि अविवाहित मुले असे परिभाषित केले आहे.
• अर्ज करताना कुटुंबातील उत्पन्नाची मर्यादा, मालमत्तेचे अस्तित्व, व अर्जदाराचे वय यासारख्या गोष्टींचा विचार केला जातो.

एकाच घरातील दोन सख्ख्या भावांना घरकुल योजनेचा लाभ मिळतो का?

हा प्रश्न अनेक नागरिकांना पडलेला असतो. उत्तर अगदी सोपं आहे – नाही, एकाच घरात राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांपैकी फक्त एकालाच घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो. सरकारच्या दृष्टीने “कुटुंब” म्हणजे एक आर्थिक युनिट (unit) असते. त्यामुळे एकाच छताखाली राहणारे दोन भाऊ जरी विवाहित असले, तरी ते एका कुटुंबात मोडतात, आणि म्हणूनच एकदाच लाभ दिला जातो.

कधी मिळू शकतो दोघांनाही लाभ?

पण जर पुढील परिस्थिती असेल, तर दोघांनाही वेगवेगळ्या लाभाचा मार्ग मोकळा होतो:

• दोन्ही भावी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील
• दोघांचे कुटुंब वेगवेगळे आहेत – म्हणजे दोघांची लग्न झाली आहेत आणि ते स्वतंत्र कुटुंबप्रमुख आहेत
• त्यांचे उत्पन्न स्वतंत्र आहे
• आणि त्यांनी याआधी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

अशा परिस्थितीत दोघेही स्वतंत्र अर्ज करू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Pradhan Mantri Awas Yojana eligibility

सरकारची घरकुल योजना (Pradhan Mantri Awas Yojana) ही खरोखरच गरजूंसाठी संजीवनी ठरते. मात्र, त्यामध्ये ठराविक अटी व नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक असते. एका कुटुंबाला एकदाच या योजनेचा लाभ मिळतो, हे लक्षात ठेवायला हवे. एकाच घरात राहणारे दोन भाऊ “एकच कुटुंब” या श्रेणीत येतात, त्यामुळे त्यापैकी फक्त एकालाच लाभ मिळतो. मात्र, जर ते वेगळ्या घरी राहत असतील आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करत असतील, तर दोघेही स्वतंत्रपणे या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात.

➡️ 2025 घरकुल यादी जाहीर, तुमच्या गावात किती लाभार्थी? – संपूर्ण माहिती पाहा मोबाइलवर

Leave a Comment