PMAY Update 2025: आता घर मिळवणं सोपं! पात्रतेच्या 3 अटी रद्द, ₹1.20 लाख मदत, नवीन निकष पाहा

PMAY Update 2025 अंतर्गत पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. पूर्वी 13 निकषांवर आधारित असलेली ही योजना आता केवळ 10 निकषांवर पात्रता निश्चित करते. त्यामुळे हजारो कुटुंबांना आता घरकुलासाठी पात्रता मिळण्याची संधी आहे. सरकारने यामध्ये मासिक उत्पन्नाची मर्यादा 10,000 रुपयांवरून 15,000 रुपये केली आहे, जी गरीब व मध्यमवर्गीयांसाठी दिलासा देणारी बाब ठरते.

नवीन पात्रता निकष: कोणाला मिळणार फायदा?

सरकारने तीन महत्त्वाच्या अटी रद्द केल्या आहेत. पूर्वी स्कूटर, दुचाकी, मासेमारीची होडी किंवा अन्य साधने असणाऱ्यांना अपात्र ठरवले जात होते. परंतु आता हे निकष रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे अल्प उत्पन्न असलेल्या कामगार, शेतकरी, मच्छीमार आणि छोट्या उद्योजकांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आर्थिक मदतीतही वाढ

पात्र लाभार्थ्यांना सरकारकडून 1.20 लाख रुपये, तर डोंगराळ किंवा दुर्गम भागातील लाभार्थ्यांना 1.30 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. ही रक्कम घरकुल बांधणीसाठी थेट बँक खात्यात जमा केली जाते. यामध्ये काही राज्यांनी श्रमदान किंवा अतिरिक्त भत्ताही दिला आहे.

सर्वेक्षणाची अंतिम तारीख वाढवली

ज्या नागरिकांना 2011 च्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणात सामील होता आलं नाही, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सरकारने सर्वेक्षणाची अंतिम तारीख 15 मे 2025 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी लवकरात लवकर स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

Mukhyamantri Bal Aashirwad Yojana
Mukhyamantri Bal Aashirwad Yojana: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, दरमहा 4000 मिळणार – अशा कुठल्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही, आर्थिक नुकसानीस बळी पडू नका

कोणत्या 13 अटी लागू होत्या?

पूर्वीच्या पात्रतेच्या 13 अटी खालीलप्रमाणे होत्या:

• कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹10,000 पेक्षा कमी
• घरात 16 ते 59 वयोगटातील प्रौढ नसणे
• महिला प्रधान कुटुंब
• सर्व सदस्य अशिक्षित असणे
• अपंग सदस्य किंवा कार्यक्षम प्रौढ नसलेले कुटुंब
• जमीन नसलेले, केवळ मजुरीवर अवलंबून असलेले कुटुंब
• वयस्क सदस्य नसणे (16-59)
• बेघर किंवा एक खोलीचे घर
• अनुसूचित जाती, जमाती किंवा अल्पसंख्याक समाज
• नाव किंवा दुचाकी वाहन असणे
• वीज नसलेले घर
• शौचालय नसलेले घर
• गॅस चूल नसणे

आता कोणत्या 3 अटी रद्द करण्यात आल्या आहेत?

PMAY Update 2025 मध्ये पुढील अटी रद्द करण्यात आल्या आहेत:

• दुचाकी किंवा मासेमारीसाठी नाव असणे
• वीज कनेक्शन नसणे
• गॅस चूल नसणे

Ration card e-KYC update
Ration card e-KYC update: रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी नसेल तर नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत जाणार

या अटींमुळे पूर्वी अनेक कुटुंबं अपात्र ठरत होती, परंतु आता ते पात्र ठरू शकतात. त्यामुळे अधिक लोकांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.

घरकुलाचं स्वप्न आता होणार साकार

PMAY Update 2025 अंतर्गत करण्यात आलेले बदल हे वास्तवात घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आशेचं किरण ठरत आहेत. अधिक लवचिक निकष, वाढवलेली उत्पन्न मर्यादा आणि सुलभ प्रक्रियेमुळे ही योजना आता आणखी लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

➡️ घरकुल पीएम आवास योजना मोबाईल वरून अर्ज करा – संपूर्ण मार्गदर्शक PMAY online application 2025

Leave a Comment