घरकुल योजना 2025-26: पहिली लाभार्थी यादी जाहीर; असे तपासा आपले नाव PMAY first beneficiary list 2025

PMAY first beneficiary list 2025: प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2025 च्या लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया मोफत असून लाभार्थी नोंदणी क्रमांक नसतानाही माहिती मिळवू शकतात.

केंद्र सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठी बातमी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2025 साठीची नविन लाभार्थी यादी अधिकृतपणे जारी करण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाणारी ही योजना 2016 मध्ये सुरू झाली होती. तिचे पूर्वीचे नाव ‘इंदिरा आवास योजना’ होते. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील आर्थिकदृ‌ष्ट्या दुर्बळ कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे आहे. या घरांच्या बांधकामासाठी सरकार आर्थिक मदत करते.

पीआयबी नुसार, योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 3 कोटींहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 2029 पर्यंत 2.95 कोटी घरे पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. या योजनेत मैदानी भागात 1.2 लाख रुपये तर डोंगराळ आणि दुर्गम क्षेत्रासाठी 1.3 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते.

दुसरी यादी लवकरच जाहीर होणार

पहिली यादी जाहीर झाली आहे; एका महिन्याच्या आत दुसरी यादी प्रसिद्ध केली जाईल. ज्यांचे नाव पहिल्या यादीत आले नाही, त्यांना दुसऱ्या यादीत समाविष्ट केले जाईल

राज्यनिहाय सर्वेक्षण

योजनेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि दुर्बळ/गरजू कुटुंबाना समाविष्ट करण्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये घरोघरी नवीन सर्वेक्षण केले जात आहे.

PMAY-G साठी पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबात खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

• कुटुंब ग्रामीण भागातील निवासी असावे.
• त्या कुटुंबाकडे पक्के घर नसावे.
• ते कुटुंब SC/ST, OBC, अल्पसंख्याक, EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक) किंवा भूमिहीन मजूर या श्रेणीतील असावे

जर तुमचे नाव यादीत नसेल, तर तुम्ही PMAY-G पोर्टल किंवा जवळच्या CSC केंद्रावर (सामान्य सेवा केंद्र) जाऊन अर्ज करू शकता.

PMAY-G 2025 पहिल्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव कसे तपासावे?

‘रजिस्ट्रेशन नंबर नसतानाही’ लाभार्थी खालील सोप्या पद्धतीने यादीमध्ये आपले नाव ऑनलाइन तपासू शकतात;

• PMAY-G च्या अधिकृत वेबसाइटवर (pmayg.nic.in) जा.

• ‘Stakeholders’ सेक्शनवर क्लिक करा आणि ‘IAY/PMAYG Beneficiary’ किया ‘Search Beneficiary’ निवडा

• रजिस्ट्रेशन नंबर नसताना ‘Advanced Search’ वर क्लिक करा.

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

• आपले राज्य, जिल्हा, ब्लॉक (तालुका) आणि गाव निवडा.

• कॅप्चा भरून ‘Submit’ वर क्लिक करा.

यानंतर, तुमच्या गावाची संपूर्ण लाभार्थी यादी दिसेल, ज्यामध्ये घराला मंजुरीची स्थिती आणि हप्त्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती उपलब्ध असेल. या योजनेत अर्ज करणे पूर्णपणे विनामूल्य आहे.

➡️ ई श्रम कार्ड असेल तर महिन्याला 3000 मिळणार; या ठिकाणी करा ऑनलाईन अर्ज

Leave a Comment