PM Kisan 20th installment status check: तुम्हाला PM किसानचे 2,000 रुपये मिळणार की नाही? 2 मिनिटांत नाव चेक करा

PM Kisan 20th installment status check: जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे (PM-KISAN) लाभार्थी असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. PM Kisan योजनेचा 20वा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र, ही रक्कम केवळ पात्र व सर्व आवश्यक (शासनाने वेळोवेळी सांगितलेली) प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल.

20वा हप्ता कधी जमा होणार?

याआधी PM-KISAN योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये वितरित झाला होता. या योजनेनुसार, दर चार महिन्यांनी 2,000 चा हप्ता शेतकऱ्यांना दिला जातो. त्यामुळे पुढील 20वा हप्ता जून 2025 च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नाही, मात्र हप्त्याचे नियोजन सुरू आहे.

➡️ घरकुल योजना 2025, तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का? लगेच तपासा!

लाभार्थी यादीत आपले नाव आहे का? अशा प्रकारे तपासा

pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा

• मुख्य पृष्ठावर ‘Beneficiary List’ या पर्यायावर क्लिक करा

• आपले राज्य, जिल्हा, तालुका व गाव निवडा

Mukhyamantri Bal Aashirwad Yojana
Mukhyamantri Bal Aashirwad Yojana: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, दरमहा 4000 मिळणार – अशा कुठल्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही, आर्थिक नुकसानीस बळी पडू नका

• नंतर ‘Get Report’ वर क्लिक करा

• यादीमध्ये आपले नाव तपासा

जर तुमचं नाव यादीत असेल , तर तुम्हाला 20वा हप्ता मिळेल

20व्या हप्त्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य

PM-KISAN चा पुढील हप्ता मिळवण्यासाठी ‘Farmer ID’ (शेतकरी ओळखपत्र) अनिवार्य करण्यात आले आहे. जे शेतकरी या ओळखपत्रासाठी नोंदणी करणार नाहीत, त्यांना पुढे 2,000 चा हप्ता मिळणार नाही.

महत्वाची टीप:

• खात्याची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे

• आधार नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा

Ration card e-KYC update
Ration card e-KYC update: रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी नसेल तर नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत जाणार

• भूमीधारक शेतकरी असणे अनिवार्य आहे

PM-KISAN लाभ मिळवण्यासाठी अंतिम संधी

PM-KISAN योजनेचा 20वा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, हा लाभ फक्त त्यांनाच मिळणार आहे, ज्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे, ज्यांची KYC पूर्ण आहे, आणि ज्यांनी Farmer ID साठी नोंदणी केली आहे. त्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान टाळण्यासाठी, तुमचं नाव यादीत आहे का (PM Kisan 20th installment status check) हे वेळेत तपासा, आवश्यक कागदपत्रे पूर्ण करा आणि लाभाची खात्री करा. सरकारकडून मिळणाऱ्या या मदतीचा योग्य लाभ घेण्यासाठी आजच योजनेतील सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा.

➡️ Check Land Records Online in Maharashtra: तुमच्या नावावर किती शेतजमीन आहे मोबाईलवरून पहा

Leave a Comment