इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता 5 दिवसात मिळणार अनुदान – जाणून घ्या अर्ज प्रक्रिया! PM E-Drive Scheme

PM E-Drive Scheme – भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा (EVs) वापर वाढवण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इलेक्ट्रिक दुचाकी अनुदान अर्ज प्रक्रिया आता आणखी जलद झाली आहे. पूर्वी जिथे EV अनुदानासाठी 40 दिवस लागायचे, आता केवळ 5 दिवसांत अनुदान मिळणार आहे!

PM E-Drive Scheme अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते, जी देशातील प्रदूषण कमी करणे आणि इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहन देणे या दृष्टीने मोठे पाऊल आहे.

PM E-Drive Scheme म्हणजे काय?

इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देणारी PM E-Drive Scheme 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली आहे आणि ती 31 मार्च 3026 पर्यंत चालणार आहे. 10,900 कोटी रुपयांच्या बजेटमधून, सुमारे 24.79 लाख इलेक्ट्रिक दुचाकी आणि 3.16 लाख तीन चाकी वाहनांना अनुदान देण्याचे लक्ष्य आहे.
या योजनेचा उद्देश आहे:

• इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवणे
• प्रदूषण कमी करणे
• चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणे

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी अनुदान किती?

इलेक्ट्रिक दुचाकी अनुदान अर्ज योजनेअंतर्गत खालील प्रमाणे अनुदान दिले जाते:

• पहिल्या वर्षी: ₹10,000 पर्यंत
• दुसऱ्या वर्षी: ₹5,000 पर्यंत

Mukhyamantri Bal Aashirwad Yojana
Mukhyamantri Bal Aashirwad Yojana: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना, दरमहा 4000 मिळणार – अशा कुठल्याही प्रकारची योजना अस्तित्वात नाही, आर्थिक नुकसानीस बळी पडू नका

ही सुविधा ओला, एथर, टीव्हीएस, बजाज चेतक यांसारख्या नामांकित ब्रँडच्या दुचाकींसाठी उपलब्ध आहे.

इलेक्ट्रिक दुचाकी अनुदानासाठी अर्ज कसा करायचा?

इलेक्ट्रिक दुचाकी अनुदान अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे:

• PM E-Drive Portal वर लॉगिन करा.
• E-Voucher साठी ऑनलाईन अर्ज भरा.
• पात्र इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करा.
• डीलरकडून E-Voucher वर सही करून पोर्टलवर अपलोड करा.

FAQs

1. पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत अनुदान किती मिळते?
➡️ पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केल्यावर पहिल्या वर्षी ₹10,000 आणि दुसऱ्या वर्षी ₹5,000 पर्यंत अनुदान मिळते.

2. इलेक्ट्रिक दुचाकी अनुदान अर्ज कसा
करावा?
➡️ तुम्ही पीएम ई-ड्राइव्ह पोर्टलवर जाऊन ई-व्हाउचर साठी अर्ज करू शकता. दुचाकी खरेदी करताना डीलरकडून व्हाउचरवर सही करून पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.

3. ईव्ही अनुदान मिळायला किती दिवस लागतात?
➡️ पूर्वी ईव्ही अनुदान मिळण्यासाठी सुमारे 40 दिवस लागत होते, पण आता ही प्रक्रिया वेगवान झाली असून फक्त ५ दिवसांत अनुदान मिळते.

Ration card e-KYC update
Ration card e-KYC update: रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी नसेल तर नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत जाणार

4. कोणती ब्रँड्स या अनुदान योजनेखाली येतात?
➡️
• ओला (Ola)
• एथर (Ather)
• टीव्हीएस (TVS)
• बजाज चेतक (Bajaj Chetak)
• यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या इलेक्ट्रिक दुचाकी या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

5. पीएम ई-ड्राइव्ह योजना कोणत्या कालावधीत लागू आहे?
➡️ ही योजना 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून, ती 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहील.

6. डीलर ई-व्हाउचर अपलोड करतो का?
➡️ होय, बहुतांश डीलर्स तुमच्यासाठी ई-व्हाउचर पोर्टलवर अपलोड करून देतात. त्यामुळे ग्राहकासाठी प्रक्रिया सोपी होते.

Leave a Comment