personal loan: आजच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत अनेक वेळा आपल्याला आर्थिक गरज भासते आणि त्यावेळी आपल्याला पर्सनल लोन (Personal Loan) ही एक सोपी आणि तत्काळ मदत वाटते. बँका आणि फायनान्स कंपन्या देखील याचा जोरदार प्रचार करतात – पूर्व-मंजूर कर्ज (Pre-approved personal loan), कोणतीही हमी नाही (personal loan without collateral), झटपट रक्कम खात्यात (Instant personal loan) हे ऐकून अनेक जण लगेचच या ऑफरला ‘हो’ म्हणतात. पण यामागची खरी वस्तुस्थिती समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
personal loan – या गोष्टींसाठी कधीही घेऊ नका पर्सनल लोन
वैयक्तिक कर्ज हे बँकांकडून किंवा इतर आर्थिक संस्थांकडून दिलं जाणारं असुरक्षित कर्ज (Unsecured Loan) असतं. यासाठी कोणतीही मालमत्ता (जसं की घर, सोनं, कार) गहाण ठेवण्याची गरज लागत नाही. हे कर्ज सहज मिळतं, विशेषतः जर तुमचा CIBIL स्कोर (Credit Score) चांगला असेल, तरीही याचे काही गंभीर तोटे आहेत. कारण यावर आकारण्यात येणारा व्याजदर (interest rates) इतर सर्व कर्जांपेक्षा जास्त असतो. काही वेळा हा दर 20% पेक्षा जास्तही असतो. त्यामुळे काही गोष्टींसाठी हे कर्ज घेणं टाळावंच.
1. मालमत्तेच्या खरेदीसाठी कधीही पर्सनल लोन घेऊ नका
मालमत्ता खरेदी करताना काही जण डाउन पेमेंटसाठी पर्सनल लोन घेतात. पण हे एक अत्यंत चुकीचं पाऊल आहे. मालमत्तेसाठी गृहकर्ज (Home Loan) हा अधिक फायदेशीर व सुरक्षित पर्याय असतो, कारण त्यावर व्याजदर तुलनेने कमी (Low interest rates) असतो. शिवाय गृहकर्जावर आयकर सवलतीही मिळतात. पर्सनल लोन घेतल्यास मालमत्तेचा कोणताही लाभदायक फायदा मिळत नाही, उलट व्याजाचा बोजा खूप वाढतो.
2. क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी पर्सनल लोन घेणं टाळा
क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरता आलं नाही, की अनेकजण त्यासाठी पर्सनल लोन घेतात. पण हा उपाय तात्पुरता असतो. एक महागडं कर्ज दुसऱ्या अधिक महागड्या कर्जानं फेडण्याचा हा प्रकार आहे. जर एखादा हप्ता चुकवला, तर त्याचे व्याज आणि दंड तुमच्यावर अधिक बोजा टाकतात. त्याचबरोबर CIBIL स्कोरही खराब होण्याचा धोका निर्माण होतो.
3. छंद आणि विलासी गोष्टींसाठी कर्ज घेऊ नका
फक्त छंद जोपासण्यासाठी किंवा विलासी जीवन जगण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेणं अत्यंत चुकीचं आहे. उदा. महागडा स्मार्टफोन, परदेश प्रवास, महागडे गॅजेट्स, ब्रँडेड वस्तू इत्यादी गोष्टींसाठी पर्सनल लोन घेणं म्हणजे आपलं भविष्य गहाण ठेवणं. या वस्तू विकून तुम्ही नंतर कर्ज फेडू शकत नाहीत, त्यामुळे व्याजासह परतफेड करणं अधिक त्रासदायक होतं.
4. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेणं म्हणजे जुगार
पर्सनल लोन घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करणं हे अतिशय धोकादायक आहे. शेअर बाजारात हमी लाभ असतोच असं नाही. बाजार पडला, तर गुंतवणूकही जाते आणि कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी उरते. त्यामुळे कर्जावर घेतलेली गुंतवणूक ही फारच रिस्की ठरू शकते.
5. कर्ज फेडण्यासाठी कधीही नवीन कर्ज घेऊ नका
बरेच लोक एका कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसरं पर्सनल लोन घेतात. पण ही सवय ‘कर्जाच्या सापळ्या’त अडकवते. प्रत्येक नवीन कर्जावर व्याज वाढत जातं, हप्त्यांची रक्कम वाढते आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडू शकता.
When not to take a personal loan
• मालमत्ता खरेदी करताना पर्सनल लोन घेऊ नका
• क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी
• छंद आणि विलासी गोष्टी
• शेअर बाजारात गुंतवणूक करताना
• पहिले कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेऊ नका
पर्सनल लोन कधी घ्यावे (Personal Loan Tips)
पर्सनल लोन हे आपत्कालीन परिस्थितीत मदतीचं ठरू शकतं. जसं की वैद्यकीय गरज, शिक्षण किंवा इतर अत्यावश्यक कारणांसाठी. पण विलास, छंद, गुंतवणूक, मालमत्ता खरेदी अशा गोष्टींसाठी हे कर्ज घेणं टाळावं. अशा प्रकारच्या वापरासाठी हे कर्ज घेतल्यास, पुढे जाऊन व्याजाचा बोजा इतका वाढतो की कर्जफेड करणे कठीण होऊन बसते. योग्य नियोजन, काटकसर, आणि गरजेनुसार योग्य कर्जाचा प्रकार निवडणं हेच चांगल्या आर्थिक आरोग्याचं गमक आहे.
➡️ फक्त 15,000 पगारवर, मिळवा 3 लाखापर्यंतचे कर्ज, कमीत कमी व्याजदरात – पहा संपूर्ण प्रोसेस