मोफत 3 गॅस सिलेंडर अनुदान खात्यात जमा; सर्वांसाठी आनंदाची बातमी Mofat Gas Cylinder Yojana

Mofat Gas Cylinder Yojana: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची आणि उपयुक्त योजना आहे. या योजनेअंतर्गत ‘उज्ज्वला योजना’ आणि ‘माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. अनेक दिवसांपासून अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी आता मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

शासनाचा महत्त्वाचा निर्णय

राज्य शासनाने 17 नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
या निर्णयानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या देयकांच्या प्रतिपूर्तीसाठी निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

एकूण निधी तरतूद

या योजनेसाठी शासनाने पुढील निधी उपलब्ध करून दिला आहे:

• SC व ST प्रवर्गासाठी एकूण 50 कोटी रुपये
• ‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग’ मार्फत
SC व ST महिला लाभार्थ्यांसाठी 30 कोटी रुपये वितरणास मंजुरी

हा निधी आर्थिक वर्ष 2025-26 मधील प्रलंबित देयकांच्या भरपाईसाठी वापरण्यात येणार आहे. या निर्णयामुळे हजारो पात्र महिलांना दिलासा मिळणार आहे.

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

निधी कसा वितरित होणार?

पात्र महिलांनी गॅस सिलेंडरसाठी जे पैसे भरले आहेत,
ते पैसे आता अनुदानाच्या स्वरूपात थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार.

• यात उज्ज्वला योजनेतील 200 रुपयांचे अनुदान वगळता उर्वरित संपूर्ण रक्कम समाविष्ट असेल.

• अनुसूचित जमातीतील महिलांसाठी निधी ‘आदिवासी विकास विभाग’ उपलब्ध करून देणार.

• खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी निधी ‘अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग’ वितरित करणार.

योजना बंद होणार की पुढे सुरू राहणार?

गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबत अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. मात्र, शासन निर्णयानुसार;

ladki bahin yojana june installment date 2026
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, जून महिन्याचा हप्ता जमा होणार, शासन निर्णय आला ladki bahin yojana june installment date 2026

• योजना बंद होत नाही
• प्रलंबित देयकांचे पैसे आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील
• योजनेचा लाभ नियमितपणे सुरू राहील

महिला लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा

या GR मुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर ही योजना घरगुती अर्थव्यवस्थेसाठी मोठा आधार ठरणार आहे.

➡️ सर्व महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; असा फॉर्म भरा, अर्ज सुरु

Leave a Comment