Mini Tractor Anudan Yojana मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू, 90% अनुदान, सविस्तर बातमी येथे पहा

Mini Tractor Anudan Yojana : राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने Mini Tractor Anudan Yojana सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळणार आहेत. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत शेतीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे.

Mini Tractor Anudan Yojana योजनेचे उद्दिष्ट आणि फायदे

● राज्यातील शेतकरी बचत गटांना आधुनिक शेती यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे.

● 2017 च्या शासन निर्णयानुसार, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, उत्पादनक्षमतेत सुधारणा व्हावी आणि श्रम व वेळ वाचवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

अनुदानाची रचना

● एकूण खर्च 3,50,000 रुपये आहे.
● यासाठी शासनाकडून 3,15,000 अनुदान दिले जाईल. तर बचत गटाने केवळ 35,000 स्वतःच्या वाट्याने भरावे लागतील.
● सरकारकडून अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल, त्यानंतर ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने खरेदी करता येतील.

Senior Citizen Card 2026
जेष्ठ नागरिक कार्ड असे काढा ऑनलाईन, मिळतील अनेक लाभ Senior Citizen Card 2026

Mini Tractor Anudan Yojana अर्ज करण्याची प्रक्रिया

● योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून इच्छुकांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx

● अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.

● अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण कार्यालयात जमा करावी.

● पात्र अर्जदारांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते.

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

हे देखील वाचा : Farmer ID Card Download Process : मोबाइलवरुन शेतकरी ओळखपत्र 2 मिनिटांत करा डाऊनलोड

Mini Tractor Anudan Yojana eligibility पात्रता आणि अटी-शर्ती काय आहेत?

● अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
● अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील बचत गटाचा सदस्य असावा.
● बचत गटातील किमान 80% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे.
● गटाचा अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.
● अनुदानाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच ट्रॅक्टर खरेदीस परवानगी दिली जाईल.
● अर्ज संख्येच्या आधारे लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते.

Leave a Comment