महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली. 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रूपयांचा लाभ थेट बँक खात्यात (DBT) जमा केला जातो.
Ladki Bahin Yojana : एप्रिल 2025 चा हप्ता कधी?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल 2025 चा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर, म्हणजेच 30 एप्रिल 2025 ला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विधानावर आधारित असून, याबाबत सोशल मीडियावरूनही अपडेट्स समोर येत आहेत.
योजनेतून वगळल्या जाणाऱ्या महिला
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी (Scrutiny) सध्या सुरू आहे, आणि यामुळे काही महिलांना यापुढे लाभ दिला जाणार नाही. योजनेच्या पात्रता निकषांचं काटेकोरपणे पालन होत आहे, त्यामुळे खालील कारणांमुळे महिला अपात्र ठरत आहेत:
● उत्पन्न मर्यादा: ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांना योजनेतुन वगळले जाईल.
● चारचाकी वाहन: ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे, त्या महिला योजनेत पात्र नाहीत
● सरकारी नोकरी किंवा पेन्शन: सरकारी नोकरीत असलेल्या किंवा सरकारी पेन्शन घेणाऱ्या महिलांना लाभ दिला जाणार नाही.
● इतर सरकारी योजना: ज्या महिला इतर सरकारी योजनांतून समान आर्थिक लाभ घेत आहेत, त्यांना या योजनेतून लाभ मिळणार नाही
● कागदपत्रांमध्ये त्रुटी: आधार लिंकिंग, बँक खात्याचे तपशील किंवा उत्पन्नाचा दाखला यामध्ये त्रुटी आढळल्यास लाभ थांबवला जाऊ शकतो.
दरम्यान, आतापर्यंत 13 लाखांहून अधिक महिला योजनेतून वगळल्या गेल्या आहेत. छाननीमुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे, आणि याचा परिणाम एप्रिलच्या हप्त्यावर देखील होईल.
Ladki Bahin Yojana : नवी नोंदणी कधी सुरु होणार?
लाडकी बहीण योजनेत नवीन नोंदणी प्रक्रिया (Registration) सध्या बंद आहे. त्यामुळे अनेक पात्र महिला योजनेपासून वंचित राहत आहेत. लाडकी बहिण योजनेची अर्ज प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 रोजी बंद करण्यात आली आहे. आणि गेल्या 6 महिन्यांपासून नवीन नोंदणी सुरू केलेली नाही. यामागचे कारण म्हणजे सरकारचे लक्ष सध्या विद्यमान लाभार्थ्यांच्या छाननीवर आहे, यामुळे योजनेवर होणारा आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल. योजनेत अर्ज प्रक्रिया बंद असल्या कारणामुळे पुढील महिलांना अर्ज करण्याची संधी मिळालेली नाही:
● नव्याने पात्र झालेल्या महिला: नुकतेच 21 वर्षे पूर्ण झालेल्या महिला
● पूर्वी नाकारलेले अर्ज: तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांचे अर्ज नाकारले गेले होते, त्यांना योजनेत पुन्हा अर्ज करण्याची संधी नाही.
● नवविवाहित महिला: ज्या लाभार्थ्यांचे नाव रेशन कार्डवर अजुनही समाविष्ट केलेले नाही.
सूत्रांनुसार, मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतरच योजनेत नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते, पण सध्या याबाबत कोणतीही ठोस तारीख जाहीर नाही.
Ladki Bahin Yojana : लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
योजनेत एप्रिल 2025 चा हप्ता मिळवण्यासाठी आणि पात्र राहण्यासाठी लाभार्थ्यांनी पुढील गोष्टींची काळजी घ्यावी:
● बँक खाते तपासा: आधार-लिंक बँक खाते आणि DBT सक्रिय असल्याची खात्री करा.
● कागदपत्रे अपडेट करा: उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आणि आधार कार्ड यामध्ये कोणतीही त्रुटी नको.
● स्थिती तपासा: योजनेच्या अधिकृत वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in वर किंवा नारी शक्ती दूत अॅप वर आपली लाभार्थी स्थिती चेक करा.
● हेल्पलाइन: योजनेत कोणत्याही समस्येबद्दल हेल्पलाइन क्रमांक 181 वर संपर्क साधा.
जर एखाद्या महिला लाभार्थीस योजनेत पुन्हा अर्ज करायचा असेल, तर तिने स्थानिक अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत किंवा सेवा केंद्र येथे संपर्क साधावा, परंतु सध्या नवीन नोंदणी प्रक्रिया बंद असल्यामुळे थोडी प्रतीक्षा करावी लागेल.