माझी कन्या भाग्यश्री योजना: मुलींना मिळणार 50 हजार अनुदान, GR आला Majhi Kanya Bhagyashree Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजने’ संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2023 पूर्वी पात्र असूनही विविध कारणांमुळे मंजूर न झालेल्या अर्जदारांना अखेर योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी शासनाने 21 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन शासन निर्णय (GR) जारी केला आहे.

योजनेची माहिती

1 ऑगस्ट 2017 पासून राज्यात ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी अनुदान बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेत;

• एका मुलीसाठी ₹50,000 अनुदान
• दोन मुली असल्यास प्रत्येकी ₹25,000 अनुदान मिळते
• अनुदान थेट मुलीच्या नावाने बँक खात्यात जमा करण्याची तरतूद आहे.

अर्ज प्रलंबित राहण्याचे कारण

30 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य सरकारने ‘लेक लाडकी योजना’ सुरू केल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री’च्या अर्जांची प्रशासकीय प्रक्रिया मंदावली. परिणामी, 1 एप्रिल 2023 पूर्वी जन्मलेल्या मुलींसाठीचे अर्ज पात्र असतानाही मंजुरी न मिळता प्रलंबित राहिले.

शासनाचा दिलासादायक निर्णय

अनेक कुटुंबे अनुदानासाठी महिनोनमहिने प्रतीक्षेत असताना अखेर शासनाने प्रलंबित पात्र अर्जदारांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अर्जांची तपासणी पूर्ण झालेल्या आणि योग्यरीत्या मंजूर असलेल्या सर्व बालकांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. हा निर्णय हजारो पालकांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो

1. ऑनलाइन अर्जासाठी:

• महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://womenchild.maharashtra.gov.in
• ‘योजना’ विभागात जाऊन ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ निवडा.
• ऑनलाईन फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा

2. ऑफलाइन अर्जासाठीः

जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन अर्ज उपलब्ध करून घ्या.
• अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह तेथेच सबमिट करा.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेतः

• मुलीचा जन्म दाखला
• पालकांचे आधार कार्ड
• उत्पन्न प्रमाणपत्र
• बँक खाते तपशील
• कुटुंब नियोजन प्रमाणपत्र

लेक लाडकी योजना: नव्याने लाभ मिळणाऱ्या मुलींसाठी

1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी राज्यात ‘लेक लाडकी योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेत मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत एकूण मिळणारे अनुदान ₹1,01,000 आहे

➡️ मोफत 3 गॅस सिलेंडर अनुदान खात्यात जमा; सर्वांसाठी आनंदाची बातमी

Leave a Comment