महिला शेतकरी प्रमाणपत्र, हे आहेत 5 जबरदस्त फायदे | Mahila Shetkari Pramanpatra Benefits

Mahila Shetkari Pramanpatra Benefits: महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ (Mahila Shetkari Pramanpatra) देण्यास सुरुवात झाली आहे. या प्रमाणपत्रासाठीचे अर्ज सुरू झाले असून, तुम्ही घरबसल्या मोबाईलवरूनही यासाठी अर्ज करू शकता.

महिला शेतकरी प्रमाणपत्र काढण्याचे 5 मोठे फायदे

बऱ्याच महिलांच्या मनात हा प्रश्न असतो की, आमचे नाव आधीच सातबाराऱ्यावर आहे, मग आम्हाला हे प्रमाणपत्र काढण्याची गरज काय? तर या प्रमाणपत्राचे महिलांना होणारे 5 प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत:

1. अधिकृत आणि कायदेशीर शेतकरी ओळख

पूर्वी महिला शेतकरी असल्याची ओळख केवळ सातबारा उतारा किंवा फेरफारवर नावावरून सिद्ध होत असे. परंतु, आता सातबाराऱ्यावर नाव असो किंवा नसो, जर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही अधिकृतपणे ‘महिला शेतकरी’ आहात, हे सहज सिद्ध होऊ शकते.

2. कृषी विभागाच्या योजनांचा थेट लाभ

शासन स्तरावरून कृषी विभागाच्या अनेक नवीन योजना महिलांसाठी आणल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना जर तुम्ही हे महिला शेतकरी प्रमाणपत्र सादर केले, तर तुम्हाला प्राधान्याने आणि सुलभतेने सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल.

3. शेतीसाठी सुलभ कर्ज (Agricultural Loan)

महिलांना शेती किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी अनेकदा कर्जाची गरज असते. याआधी बऱ्याचदा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे महिलांना कर्ज मिळण्यात अडचणी येत असत. परंतु, या प्रमाणपत्रामुळे महिला ही अधिकृत शेतकरी असल्याचे सिद्ध होईल, ज्यामुळे बँकांकडून शेतीसाठी कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर होईल.

4. पीक विमा योजनेचा लाभ

पिकांचे नुकसान झाल्यावर पीक विमा काढताना किंवा भरपाई मिळवताना पूर्वी फक्त सातबारा धारकांनाच प्राधान्य मिळत असे. या नव्या प्रमाणपत्राचा फायदा अशा महिलांना होईल ज्या स्वतःची शेती नसताना दुसऱ्याची शेती कसायला घेतात (खावटीने किंवा बटईने). अशा महिलांनाही आपल्या पिकाचा विमा उतरवता येईल आणि नैसर्गिक आपत्तीत पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळू शकेल.

Mahabhumi village map download Online
असे काढा 13 प्रकारचे ऑनलाईन नकाशे मोबाईलवरुन, नवीन सेवा सुरू Mahabhumi village map download Online

5. शेतमाल विक्री आणि बाजारपेठेत सहभाग

शेतमालाची थेट विक्री करण्यासाठी, तसेच कृषी बाजारपेठांमध्ये किंवा महिला बचत गटांतर्गत शेतमाल विक्रीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना शेतीत योग्य अधिकार मिळवून देण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. तुमच्या परिसरातील सर्व शेतकरी महिलांपर्यंत हा लेख नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लवकरात लवकर लाभ घेता येईल!

Mahila Shetkari Pramanpatra (FAQs)

Q1. महिला शेतकरी प्रमाणपत्र म्हणजे काय?

उत्तर: महिला शेतकऱ्यांना अधिकृत आणि कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ दिले जात आहे. याद्वारे महिला शेतकरी असल्याचे सिद्ध होते.

Q2. महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कोण अर्ज करू शकते?

उत्तर: शेती करणाऱ्या किंवा शेतीशी संबंधित कामकाज पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व महिला या प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

Mahila Shetkari Certificate
महिला शेतकरी प्रमाणपत्र फक्त याच महिलांना, नवा GR|Mahila Shetkari Certificate

Q3. सातबारा नसलेल्या महिलांना हे प्रमाणपत्र मिळते का?

उत्तर: होय, सातबाराऱ्यावर नाव नसले तरीही शेतीशी जोडलेल्या किंवा दुसऱ्याची शेती कसायला घेणाऱ्या महिला हे प्रमाणपत्र काढू शकतात.

Q4. महिला शेतकरी प्रमाणपत्राचे मुख्य फायदे काय आहेत?

उत्तर: या प्रमाणपत्राद्वारे सरकारी व कृषी योजनांचा लाभ मिळवणे, शेतीसाठी सुलभ बँक कर्ज घेणे, पीक विमा उतरवणे आणि शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेत सहभाग घेणे सोपे जाते.

हे देखील वाचा: महिला शेतकरी प्रमाणपत्र फक्त याच महिलांना, नवा GR

Leave a Comment