कृषी मित्र भरती ऑनलाईन अर्ज सुरू! जाणून घ्या संपूर्ण माहिती Krushi Mitra Bharti 2026

Krushi Mitra Bharti 2026: कृषी विभागाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली कृषी मित्र पदभरती अखेर ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. कृषी महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर आता कृषी मित्र भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत.

मागील काही दिवसांत कृषी सहायकांच्या माध्यमातून हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी अर्ज स्वीकारताना होणारा गोंधळ आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या व इच्छुकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या सर्व गोष्टींचा विचार करून कृषी विभागाने अखेर ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि सुटसुटीत करण्यासाठी ऑनलाईन अर्जप्रणाली सुरू केली आहे.

कृषी मित्र भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना खालीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत:

  • शैक्षणिक पात्रता कागदपत्रे: तुम्ही दहावी पास, बारावी पास किंवा पदवीधर (Graduate) असाल, तर तुमच्या शिक्षणा,नुसार संबंधित गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांची आवश्यकता असेल.
  • हमीपत्र: ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध असलेले हमीपत्र डाऊनलोड करून, त्यावर सही करून पुन्हा स्कॅन करून अपलोड करावे लागेल.
  • महिला शेतकऱ्यांसाठी: महिला शेतकरी असल्यास, महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या आधारे देखील यासाठी अर्ज करता येणार आहे.
  • फार्मर आयडी किंवा ७/१२ (सातबारा): अर्जासाठी शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) असणे अनिवार्य आहे. जर फार्मर आयडी नसेल, तर पर्या ol म्हणून ७/१२ उतारा अपलोड करावा लागेल.

मानधन आणि इतर महत्त्वाची माहिती

  • मानधन: या योजनेअंतर्गत कृषी मित्रांना ₹१,५०० प्रति महिना एवढे मानधन दिले जाणार आहे. त्यानुसार वार्षिक ₹१८,००० मानधनावर ही भरती केली जाईल.
  • पात्रता व निकष: या भरतीसाठी कोण पात्र असणार, शिक्षणाची अचूक अट काय असेल, पगार कसा मिळणार आणि निवडीचे निकष काय आहेत, याची सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

कृषी महाराष्ट्राच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तुम्ही घरबसल्या किंवा नजीकच्या महा-ई-सेवा केंद्राद्वारे यासाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण येत असेल किंवा ऑनलाईन अर्ज कसा करावा? याबद्दल सविस्तर स्टेप-बाय-स्टेप व्हिडिओ हवा असेल, तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा! त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ.

Krushi Mitra Bharti 2026 (FAQs)

प्रश्न १: कृषी मित्र भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

उत्तर: कृषी मित्र भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी कृषी महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटला (माहिती पोर्टल) भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. अर्ज भरताना आवश्यक ती सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि ७/१२ किंवा फार्मर आयडी अपलोड करणे बंधनकारक आहे.

Lek Ladki Yojana 2026 Online Apply
लेक लाडकी योजना, मुलींना 1 लाख रुपये! असा भरा ऑनलाइन फॉर्म Lek Ladki Yojana 2026 Online Apply

प्रश्न २: कृषी मित्राला महिना किती मानधन (पगार) मिळणार आहे?

उत्तर: कृषी मित्र या पदासाठी प्रति महिना ₹१,५०० एवढे मानधन दिले जाणार असून, वर्षाला एकूण ₹१८,००० मानधन मिळणार आहे.

प्रश्न ३: कृषी मित्र भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी पास, बारावी पास किंवा पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.

प्रश्न ४: फार्मर आयडी (Farmer ID) नसेल तर अर्ज करता येईल का?

उत्तर: होय, जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल, तर पर्याय म्हणून तुम्ही ७/१२ (सातबारा) उतारा अपलोड करून अर्ज करू शकता.

Bandhkam Kamgar Yojana Vastu Sanch 2026
बांधकाम कामगारांना 10 वस्तूंचा मोफत संच; लाभ कसा मिळवावा? वाचा सविस्तर Bandhkam Kamgar Yojana Vastu Sanch 2026

प्रश्न ५: महिला शेतकरी या भरतीसाठी अर्ज करू शकतात का?

उत्तर: होय, महिला शेतकरी सुद्धा महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या आधारे या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

हे देखील वाचा: लेक लाडकी योजना, मुलींना 1 लाख रुपये! असा भरा ऑनलाइन फॉर्म

Leave a Comment