Mahavitaran Light Bill Download: पूर्वीप्रमाणे ग्राहक क्रमांक टाकून थेट वीज बिल पाहणे आता शक्य नाही. सुरक्षेच्या कारणास्तव, बिल पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी युजरला स्वतःचे अकाउंट उघडून लॉगिन करणे आवश्यक आहे
टप्पा 1: नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी (User Registration)
• वेबसाईटवर जा: wss.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
• नोंदणी पर्याय निवडा: To View / Download Bill PDF using Login and Register या खालील ‘क्लिक हिअर फॉर युजर रजिस्टर’ (Click here for user register) या बटनावर क्लिक करा.
• माहिती भरा:
• ग्राहक क्रमांक (वीज बिलावरील Customer Number)
• भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर)
• ईमेल आयडी (व्यवस्थित आणि कायमस्वरूपी)
• OTP पडताळणी: ईमेल आयडी टाकून ‘ओटीपी पाठवा’ (Send OTP) वर क्लिक करा आणि ईमेलवर आलेला OTP टाकून पडताळणी (Validation) करा.
• पासवर्ड तयार करा:
• एक प्रवेश नाम (Username) तयार करा. (उदा. Name123)
• एक पासवर्ड (Password) सेट करा आणि तो कन्फर्म करण्यासाठी पुन्हा टाका.
• नोंदणी पूर्ण करा:‘नोंद करा’ (Register) बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन यशस्वी करा.
टप्पा 2: लॉग इन करणे (Login)
• नोंदणी यशस्वी झाल्यावर लॉगिन पेजवर परत या.
• तयार केलेले प्रवेश नाम (Username) आणि पासवर्ड (Password) टाका.
• कॅप्चा (Captcha) भरून ‘प्रवेश’ (Login) बटनावर क्लिक करा.
• OTP पडताळणी: लॉगिन केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो टाकून ‘व्हॅलिडेट ओटीपी’ (Validate OTP) करा.
टप्पा 3: ग्राहक क्रमांक जोडणे (Add Consumer Number)
• आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ‘डब्ल्यूएसएस खात्याची ग्राहक जोडण्यासाठी’ चा पर्याय दिसेल.
• ग्राहकाचा प्रकार (LT/HT) निवडा.
• तुमचा ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट (Billing Unit) टाका.
• ‘जोडा’ पर्यायावर क्लिक करा. सुरक्षिततेसाठी पुन्हा एकदा OTP येईल. तो टाकून ग्राहक क्रमांक जोडा.
टप्पा 4: वीज बिल पाहणे आणि डाऊनलोड करणे
• ग्राहक क्रमांक जोडल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटखाली लाईट बिल दिसेल.
• बिल पाहण्यासाठी/डाऊनलोड करण्यासाठी असलेल्या ‘ई’ चिन्हावर (E Symbol) क्लिक करा.
• वरच्या बाजूला असलेल्या हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या ‘प्रिंट / डाऊनलोड’ (Print / Download) पर्यायावर क्लिक करून तुम्ही वीज बिलाची PDF फाईल सेव्ह (Save) करू शकता.
टीप: आता फक्त नोंदणीकृत वापरकर्तेच स्वतःचे बिल पाहू आणि डाऊनलोड करू शकतील.
➡️ लाडकी बहीण योजना: eKYC झाली की नाही? ‘असे’ तपासा, नाहीतर थांबू शकतो हप्ता!