महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या वेळा बदलणार, 15 जूनपासून नवीन वेळापत्रक लागू  Maharashtra Schools Time Table Change

Maharashtra Schools Time Table Change: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. येत्या 15 जून 2025 पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांचे वेळापत्रक बदलणार आहे. यापुढे शाळा सकाळी 9 वाजता सुरू होणार असून दुपारी 4 वाजता सुटणार आहेत. ही वेळापत्रकातील बदलांची योजना नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत असल्याचे बोलले जात आहे.

कधीपासून लागू होणार नवीन वेळापत्रक?

राज्यातील शैक्षणिक वर्ष 2025-26 हे 15 जून 2025 पासून सुरू होणार आहे. मागील वर्षी म्हणजेच 2024-25 या शैक्षणिक वर्षाची समाप्ती उशिरा झाल्याने यावर्षी पालक आणि विद्यार्थी शाळा केव्हा सुरू होतील याकडे उत्सुकतेने पाहत होते. मात्र, महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 15 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

➡️ 10वी 12वी नंतर हे कोर्स करा आणि महिन्याला लाखो रुपये कमवा! high salary courses after 10th and 12th

PM Kisan 20th Installment
PM Kisan 20th Installment: PM किसान 2000 हप्ता 2 ऑगस्टला जमा होणार – कृषी मंत्रालयाने केले जाहीर

नवीन वेळापत्रक कसे असेल? (Maharashtra Schools Time Table Change)

मीडिया रिपोर्टनुसार शाळांचे नवीन वेळापत्रक खालीलप्रमाणे असणार आहे:

• शाळा सुरू होण्याची वेळ: सकाळी 9:00 वाजता
• परिपाठ: 9:00 ते 9:25
• तासिका: 9:25 ते 11:25 (पहिल्या तीन तासिका)
• लहान सुट्टी: 11:25 ते 11:35
• पुढील दोन तासिका: 11:35 ते 12:50
• मोठी सुट्टी: 12:50 ते 1:30
• शाळा पुन्हा भरल्यानंतर: 1:30 ते 3:55 (शेवटच्या तीन तासिका)
• वंदे मातरम व शाळा सुट्टी: 3:55 ते 4:00

या बदलाचा परिणाम काय होणार?

नवीन वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना शाळेतून दुपारी 4 वाजता सुट्टी मिळेल, जे आधीच्या 5 वाज्याच्या तुलनेत एक तास आधी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास, खेळ किंवा इतर उपक्रमांसाठी अधिक वेळ मिळेल. शिक्षक व पालक वर्गालाही या बदलाचा सकारात्मक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

Check Ration Card List Online
Check Ration Card List Online: तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून पाहा 2 मिनिटांत

नवीन शैक्षणिक धोरणाचे संभाव्य परिणाम

नवीन वेळापत्रक हे केवळ वेळेपुरते मर्यादित नाही. हे बदल ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ (NEP 2020) च्या अंमलबजावणीचा भाग असू शकतात. त्यामुळे पुढील काळात अभ्यासक्रम, मूल्यांकन प्रणाली आणि अध्यापनाच्या पद्धतींमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे.

➡️ दहावी बारावीचे मूळ गुणपत्रक विद्यार्थ्यांना या तारखेपासून मिळणार SSC HSC Original Marksheet 2025

Leave a Comment