Maharashtra electricity bill discount: राज्यातील ‘या’ ग्राहकांना वीजबिलात मिळणार 10% सवलत! – मुख्यमंत्र्यांची माहिती

Maharashtra electricity bill discount: महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले आहे की, ज्या ग्राहकांकडे स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवलेले आहेत, त्या 38 लाख ग्राहकांना सौर तासांमध्ये वापरलेल्या विजेवर 10% सवलत दिली जाणार आहे. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये दिली.

स्मार्ट मीटरबाबत असलेली संभ्रमाची स्थिती

गेल्या काही काळात स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या आहेत. अनेक लोकांना हे मीटर विजेचे बिल वाढवतात की काय, याबाबत शंका वाटत होती. काहींनी याला जबरदस्तीचं म्हणून विरोध केला, तर काहींनी त्याचे फायदे स्वीकारले. अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली ही माहिती नागरिकांच्या चिंतेला दिलासा देणारी आहे.

विधान परिषदेमधील माहितीचा तपशील

विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या सत्रात सदस्य मिलिंद नार्वेकर, ॲड. अनिल परब आणि प्रवीण दरेकर यांनी स्मार्ट मीटरबाबत सरकारचे धोरण विचारले होते. याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राज्यात 27,826 फिडर मीटर आणि 38 लाख स्मार्ट ग्राहक मीटर कार्यरत आहेत. त्यामुळे वीज वापराचे अचूक आणि पारदर्शक मोजमाप शक्य झाले आहे.

Ladki Bahin Yojana KYC Last Date
Ladki Bahin Yojana KYC Last Date: लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटचा दिवस

केंद्र सरकारकडून मोठा निधी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, स्मार्ट मीटर योजनेसाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला तब्बल 29,000 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. शिवाय, राज्यातील वीजदर देशातील इतर अनेक राज्यांच्या तुलनेत आधीच कमी आहेत, हेही त्यांनी अधोरेखित केले.

स्मार्ट मीटर – सक्ती नाही, पर्यायी सुविधा

महत्वाचे म्हणजे, स्मार्ट मीटर बसवणे हे सक्तीचे नसून एक पर्यायी सुविधा आहे. यामध्ये प्रत्येक युनिटचा हिशोब ऑटोमॅटिक पद्धतीने होतो, त्यामुळे विजबिल वाढेल अशी कोणतीही शक्यता नाही. हे मीटर पारदर्शकतेला आणि ग्राहकांच्या सोयीला प्राधान्य देणारे आहेत.

चार खासगी कंपन्यांना कंत्राट

या योजनेसाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून चार खासगी कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे वीज वापराचे रिअल टाईम मोजमाप शक्य होणार असून बिलातील घोळ, चुका किंवा अंदाजाच्या आधारावर बिल बनणे टाळले जाईल.

e pik pahani last date
e pik pahani last date: ई पीक पाहणीला या तारखेपर्यंत मुदतवाढ! मोबाईलवरुन अशी करा झटपट नोंदणी

वनभागातील नागरिकांसाठीही योजना

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला – वन जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांसाठीही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी खास योजना तयार केली जाणार आहे. यासाठी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन, एक ठोस प्रस्ताव तयार केला जाईल आणि तो न्यायालयासमोर सादर केला जाईल.

Maharashtra electricity bill discount

स्मार्ट मीटर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 10% सवलतीची ही योजना निश्चितच एक सकारात्मक पाऊल आहे. यामुळे वीजबिलात पारदर्शकता, अचूकता आणि ग्राहकांचा विश्वास वाढणार आहे. शिवाय, पर्यावरणपूरक वीज वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. स्मार्ट मीटरचा स्वीकार हा भविष्यातील स्मार्ट आणि जबाबदारीपूर्ण ऊर्जावापराच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

हे देखील वाचा

पाऊस लांबला; या तारखेनंतर पुन्हा मुसळधार

Leave a Comment