लोन वेळेआधी फेडण्याचे तोटे अधिक, जाणून घ्या तज्ञांचे मत

Loan Prepayment : आर्थिक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आपण कर्ज घेतो. कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड कशी आणि कधी करावी हे ठरवणे अत्यंत महत्वाचे असते. कर्ज परतफेड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी एक म्हणजे लोन प्री पेमेंट.

कर्जदाराकडे अधिक पैसे आल्यास किंवा त्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यास प्रत्येकजण लोन प्री पेमेंट (Loan Pre-payment) करण्याचा विचार करत असतो. कर्ज लवकर परतफेड करण्याचे काही फायदे आहेत, तसे काही तोटे आहेत. त्यामुळे असे निर्णय घेतेवेळी कर्जदाराने काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. लोन प्री पेमेंट बाबत येथे सविस्तर माहिती पाहूया.

कर्ज लवकर फेडण्याचे फायदे आणि तोटे कोणते?

तुम्ही वेळेआधी कर्ज फेडता म्हणजे आर्थिक तणावातून तुम्ही लवकर मुक्त होता, हे जरी खरे असले तरीही वेळेआधी कर्ज फेडताना त्यामध्ये काही लपलेले धोके असतात. तसेच अतिरिक्त शुल्क देखील भरावे लागत असते याकडे दुर्लक्ष होता कामा नये. काही बँकां आणि आर्थिक संस्था आहेत ज्या वेळेआधी कर्ज फेडल्यानंतर काही शुल्क आकारत असतात. तसेच वेळेआधी कर्ज फेडण्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर देखील होत असतो. त्यामुळे लोन प्री पेमेंट करण्याचा विचार करण्यापूर्वी याचे फायदे आणि तोटे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

लोन प्री पेमेंटवर बँकांचे शुल्क

मुदतीपूर्वी एखादे कर्ज तुम्ही फेडत असाल तर काही बँका आणि आर्थिक संस्था यासाठी अतिरिक्त शुल्क आकारत असतात. कर्जाच्या उर्वरित रकमेच्या 1% ते 5% दरम्यान हे शुल्क आकारले जाऊ शकते.

वेळआधी कर्ज फेडल्यामुळे त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोरवर देखील परिणाम होतो

फायदे : Loan Prepayment Benefits

● ज्यावेळी तुम्ही कर्ज वेळआधी फेडता त्यावेळी तुम्हाला व्याजामध्ये बचत होते.

● कर्जाची मोठी रक्कम बाकी असल्यास प्री पेमेंट या पर्यायामुळे तुम्हाला अधिक व्याज वाचवता येते.

● वेळेआधी कर्ज फेडल्यामुळे तुमच्यावरील आर्थिक ताण कमी व्हायला मदत होते.

● तुमचा क्रेडिट कार्ड स्कोर सुधारला जातो.

● भविष्यामध्ये नवीन कर्ज घ्यायचे झाल्यास तुम्हाला सुलभता मिळते.

Ladki Bahin Yojana January Installment Date
लाडकी बहीण योजना: जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर अपडेट Ladki Bahin Yojana January Installment Date

● तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये विश्वासार्हता वाढते

तोटे : Loan Prepayment Disadvantages

● वेळआधी कर्ज फेडताना तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागते.

● कर्जाची रक्कम मोठी असल्यास शुल्काचा परिणाम जास्त असतो.

● जेव्हा तुम्ही शुल्क भरता तेव्हा तुम्हाला मिळणारा फायदा कमी होऊ शकतो.

● मुदतीपूर्व कर्ज फेडल्यास काही बँका तुमच्या क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम करतात.

● यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर (Credit Score) कमी होऊ शकतो

उदाहरणार्थ – उर्वरित कर्जाची रक्कम ही 20 लाख रुपये असल्यास प्री पेमेंट शुल्क 2% असेल त्यावेळी तुम्हाला 40,000 रुपये अतिरिक्त भरावे लागतील. त्यामुळे हे उर्वरित शुल्क किती आहे याची माहिती करून घेऊनच प्री पेमेंट बद्दल निर्णय निश्चित करा.

कोणत्या वेळी कर्ज लवकर फेडल्याने फायदा होतो?

● कर्जाची मुदत ही सुरुवातीच्याच टप्प्यात असेल तर अशावेळी प्री पेमेंट पर्याय निवडल्याने तुम्हाला जास्त व्याज वाचवता येऊ शकते.

● मुदतीच्या शेवटी प्री पेमेंट हा पर्याय निवडल्यास तुम्हाला जास्त फायदा होत नाही कारण व्याजाचा बहुतांशी भाग हा आधीच भरलेला असतो.

● कर्जाच्या सुरुवातीलाच प्री पेमेंट पर्याय निवडला तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो कारण बाकीच्या कर्ज मुदतीत तुम्हाला कमी व्याज लागू शकते.

Ladki Bahin Yojana KYC Correction 2026
लाडकी बहीण योजना: 31 मार्च 2026 पर्यंत अर्जात झालेली KYC चूक अशी करा दुरुस्त; नवीन GR जाहीर! Ladki Bahin Yojana KYC Correction 2026

उदाहरणार्थ – जर तुम्ही 10 लाखांचे होम लोन घेतले असेल आणि त्याचा व्याजदर हा 20 वर्षांच्या मुदतीसाठी 8% असेल तर अशा वेळेस सुरुवातीच्या 5 वर्षांत प्री पेमेंट हा पर्याय निवडल्यास तुमचे मोठ्या प्रमाणावर व्याज वाचणे शक्य होईल. हेच जर कर्जाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही प्री पेमेंट पर्याय निवडला तर तुम्हाला याचा अधिक फायदा मिळणार नाही.

कर्ज लवकर फेडल्यास कधी नुकसान होऊ शकते?

● तुमची कर्जाची मुदत पूर्ण होण्यासाठी कमी वेळ शिल्लक असेल तर, अशावेळी प्री पेमेंट हा पर्याय जास्त फायदा देत नाही.

● बँकेचे प्री पेमेंट शुल्क जास्त असल्यास तुम्ही बचत केलेल्या व्याजाच्या तुलनेमध्ये तुमचे नुकसान होऊ शकते.

● वेळेआधी कर्ज फेडल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होत असतो, यावेळी तुमचा क्रेडिट स्कोर कमी होण्याची शक्यता असते.

तज्ञांचा सल्ला घ्या..

मुदतीपूर्वी कर्ज फेडण्यापेक्षा ते नियमितपणे हप्ते भरून फेडणे अधिक फायदेशीर आहे असे तज्ञांचे मत आहे. अशावेळी तुम्हाला प्री पेमेंट शुल्क भरावे लागत नसते तसेच तुमचा क्रेडिट स्कोर देखील सुधारत असतो. मुदतीच्या शेवटी प्री पेमेंट ऑप्शन निवडल्यास त्यामधून मिळणारा फायदा हा कमी असतो.

तुमच्या सध्याच्या असणाऱ्या आर्थिक स्थितीनुसार प्री पेमेंट करण्यासाठी निर्णय घ्या. तुमच्याकडे अतिरिक्त निधी असल्यास तुम्हाला तो योग्य ठिकाणी गुंतवून अधिक परतावा मिळत असेल तर, लोन प्री पेमेंट हा पर्याय निवडण्यापेक्षा गुंतवणुकीचा पर्याय निवडणे अधिक फायदेशीर. लोन प्री पेमेंट हा ऑप्शन निवडण्यापूर्वी शुल्क, बचत आणि तुमच्या भविष्यामधील आर्थिक गरजांचा विचार करा.

वेळेआधी कर्ज फेडल्यामुळे तुमच्यावरील आर्थिक ताण कमी होत असतो परंतु, तुम्हाला काही अतिरिक्त शुल्क देखील भरावे लागत असते. आणि त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोरवर देखील नकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे वेळेआधी कर्ज फेडण्याचा निर्णय घेताना त्याचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजूंचा विचार करा आणि मगच तज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घ्या.

Leave a Comment