लाडकी बहीण योजना, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार; जीआर आला Ladki Bahin Yojana Installment Gr

Ladki Bahin Yojana Installment Gr: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. निधी वितरणाबाबतचा शासकीय निर्णय (जीआर) नुकताच जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे अनेक दिवसांपासूनच्या प्रतीक्षेला विराम मिळाला आहे.

निधी वितरणाचा महत्त्वाचा शासकीय निर्णय (जीआर)

​माजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल अनेक दिवसांपासून कोणतीही नवीन माहिती किंवा जीआर आला नव्हता. मात्र, आता निधी वितरणाचा जीआर प्राप्त झाला आहे.

• ​जीआरची तारीख आणि संदर्भ: हा जीआर 8 डिसेंबर 2025 रोजी जाहिर झाला असुन, तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत आहे.

या जीआरमध्ये नमूद केल्यानुसार, वित्त विभागाने ठरवून दिलेल्या कार्यप्रणालीनुसार निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नोव्हेंबर 2025 च्या हप्त्यासाठी वितरित निधी

​वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार, योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

• ​उद्देश: नोव्हेंबर 2025 महिन्याचा आर्थिक लाभ अदा करणे.
• ​लेखाशीर्षक: 31 सहायक अनुदाने वेतननेत्री.
• ​मंजूर निधी: या उद्दिष्टाखाली ₹263.45 कोटी (दोनशे त्रेसष्ट कोटी पंचेचाळीस लाख रुपये) इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता कधी जमा होणार?

​निधी वितरणाची मान्यता मिळाल्यामुळे, नोव्हेंबर महिन्याचा हा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे.

• ​जमा होण्याची वेळ: हा आर्थिक लाभ डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये, म्हणजेच येत्या चार ते पाच दिवसांत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

केवायसी (KYC) बद्दल महत्त्वाची सूचना

​सध्या जमा होणाऱ्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची केवायसी (KYC) झाली आहे की नाही, यावर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच, केवायसी झाली असो किंवा नसो, पात्र महिलांना हा हप्ता मिळणार आहे.

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

महत्वाचा संदेश: सर्व पात्र महिला लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे.

➡️ मुलींना मिळणार 1 लाख रूपये अनुदान, हा फॉर्म भरा; आंगणवाडी केंद्रात जमा करा, अर्ज सुरु

Leave a Comment