Ladki Bahin Yojana – महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहे. या योजनेत दरमहा 1500 रुपये मिळवणाऱ्या महिलांसाठी सरकारने आणखी एक दिलासादायक घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, आता या योजनेच्या लाभार्थी महिलांना 40,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचा विचार सुरू आहे.
➡️ लाडकी बहिण योजना नवी नोंदणी प्रक्रिया केव्हा सुरु होणार? Majhi Ladki Bahin Yojana Update 2025
स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ
ज्या महिलांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करायचा आहे पण त्यांच्याकडे भांडवलाची कमतरता आहे, अशा महिलांसाठी हा निर्णय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता आता स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. अजित पवारांनी सांगितले की, बँकांमार्फत हे कर्ज दिले जाणार असून, या कर्जाचा हप्ता सरकारकडूनच भरण्याचा विचार सरकार करत आहे.
बँकांचा पुढाकार, उद्योगासाठी भांडवल उपलब्ध
या योजनेसाठी काही सहकारी आणि जिल्हा बँका पुढे आल्या आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील बँकेसोबत चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. या योजनेमुळे महिलांना केवळ मासिक आर्थिक मदत नव्हे, तर दीर्घकालीन उपजीविकेचा मार्ग उपलब्ध होईल. अजित पवार म्हणाले, “५० हजार रुपयांचे भांडवल मिळाले तर महिलाही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि कुटुंब उभे करू शकतात.”
➡️ राज्यातील महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान, आजच अर्ज करा Lakhpati Didi Yojana
योजना सुरूच राहणार – अफवांवर विश्वास ठेवू नका
ही योजना बंद होणार असल्याच्या अफवांवर अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात खुलासा केला. “एखाद्या महिन्यात उशीर झाला तरी विरोधक अफवा पसरवतात. पण महिलांनी त्यावर विश्वास ठेवू नये. योजना सुरूच राहणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांसाठीही दिलासादायक निर्णय
याच वेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठीही एक महत्त्वाची माहिती दिली – कृषी पंपाच्या वीजबिलासाठी महिना 20 हजार कोटी रुपये सरकारकडून भरले जातात. या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
लाडकी बहीण योजना आता केवळ मासिक भत्त्यापूरती मर्यादित न राहता, महिलांच्या हातात आर्थिक ताकद देण्यासाठी पुढे सरसावली आहे. उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही संधी एक नवा अध्याय ठरू शकते.