लाडकी बहीण योजना, नवीन जीआर; पुन्हा EKYC? महत्वाची सूचना Ladki Bahin Scheme KYC Update GR

Ladki Bahin Scheme KYC Update GR: राज्यातील महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय (GR) 11 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी (e-KYC) संदर्भात आहे. या निर्णयामुळे ज्या विधवा, अविवाहित, एकल किंवा घटस्फोटित महिलांच्या केवायसीमध्ये चुका झाल्या आहेत किंवा ज्या अजूनही संभ्रमात आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पात्र महिलांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रमाणीकरण

​’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत हा जीआर घेण्यात आला आहे. ज्या महिलांनी आपली केवायसी पूर्ण केली आहे, परंतु त्यात काही चुका झाल्या आहेत असे वाटत असेल, त्यांना आता केवायसी पुन्हा एकदा करण्याची संधी मिळणार आहे.

विधवा आणि घटस्फोटीत महिलांसाठी विशेष सूचना

​ज्या महिला लाभार्थींचे पती अथवा वडील हयात नाहीत (विधवा) किंवा ज्यांचा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांना खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे:

• ​ऑनलाइन ई-केवायसी: लाभार्थी महिलांनी योजनेच्या अधिकृत पोर्टल ladkibahini.maharashtra.gov.in वर ई-केवायसी पूर्ण करावी.
• ​कागदपत्रे जमा करा: ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर, संबंधित कागदपत्रे (पती/वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेशाची सत्यप्रत) 31 डिसेंबर 2025 पर्यंत संबंधित अंगणवाडी सेविकेकडे जमा करायची आहेत.

या महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकेमार्फत पार पाडली जाईल.

Aadhar Seeding for DBT Payments
Aadhar Seeding for DBT Payments: हप्ता जमा झाला नाही? बँक खात्याला आधार लिंक करणे आणि सीडिंग करणे यात मोठा फरक! सरकारी अनुदानासाठी ‘हे’ काम करणे आहे अनिवार्य

ई-केवायसी दुरुस्त करण्याची ‘वन-टाईम’ संधी

​ज्या महिला लाभार्थ्यांनी यापूर्वी ई-केवायसी पूर्ण केली आहे, परंतु त्यांच्याकडून पर्याय निवडताना (उदा. विधवा, घटस्फोटित) काही चुका झाल्या असतील, तर अशा लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

• ​या महिलांना पुन्हा एकदा वेब पोर्टलवर ई-केवायसी करता येणार आहे.
• ​यासाठी वन-टाईम एडिट (One-Time Edit) चा पर्याय 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ही संधी शेवटची संधी असून, त्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत आणि कोणताही पर्याय उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे महिला लाभार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूक माहिती भरून केवायसी पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

क्षेत्रीय यंत्रणेला सहकार्याचे निर्देश

​या जीआर अंतर्गत, क्षेत्रीय यंत्रणांना (अंगणवाडी सेविका आणि इतर अधिकारी) पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे अंगणवाडी सेविका कागदपत्रे स्वीकारत नाहीत, अशा तक्रारी आता कमी होण्यास मदत होणार आहे.

​केवायसी करताना ज्या महिलांना ‘ओटीपी’ (OTP) समस्या किंवा संभ्रम होते, त्या सर्व महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. महिला घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

Ladki Bahin Yojana Helpline Number
आदिती तटकरेंची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा; आता ‘या’ नंबरवर कॉल करताच सुटणार सर्व प्रश्न Ladki Bahin Yojana Helpline Number

➡️ लेक लाडकी योजना, लाभार्थ्यांच्या खात्यात येणार 5000 रुपये, जीआर आला

Leave a Comment